ठाणे – घोडबंदर मार्गावरील आनंदनगर ते कासारवडवली दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे एकेरी मार्गाद्वारे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न वाहतूक विभागाकडून केला जात आहे. परंतू, मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु आहे. परिणामी या मार्गावर वाहनांच्या रांगा वाढल्या आहेत. ठाणे वाहतूक विभागाकडून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घोडबंदर हा भाग वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो. त्यामुळे गुरुवारी घोडबंदर मार्गावरील आनंदनगर ते कासारवडवली दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामा दरम्यान वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक विभागाकडून एकेरी मार्गाद्वारे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतू, या मार्गावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री तीन हात नाका ते माजिवडा पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीचा फटका शहरातील अंतर्गत मार्गांवर देखील बसला.
ठाणे वाहतूक विभागाकडून नागरिकांना आवाहन
या पार्श्वभूमीवर मोटर , रिक्षा, बस चालक तसेच दुचाकीस्वार यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा. आनंदनगर जंक्शनहून डावीकडे वळून परदेशी बाबा चौकहून उजवीकडे सेव्हन यार्ड स्कूल वरून उजवीकडे टायटन रुग्णालयाकडून → डावीकडे इच्छित स्थळाकडे जावे. या पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक कोंडी टाळण्यास हातभार लावावा असे आवाहन वाहतूक विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.