एखाद्या प्रकरणात गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्यास त्यातील रक्कम परत मिळणे अनेकदा अश्यक ठरत असते किंवा त्यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागते. परंतु ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने जलदगतीने केलेल्या तपासामुळे २० गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हासू उमटले आहे. सुमारे चार ते पाच वर्षानंतर या गुंतवणूकदारांना त्यांचे गुंतविलेली १०० टक्के रक्कम मिळणार आहे. त्यांसदर्भाचे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाने पारित केले आहेत.

आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने कंपनीचे बँक खाते गोठविले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांची रक्कम संरक्षित झालेली होती. बहुतांश गुंतवणूकदार हे वयोवृद्ध असून ते ख्रिश्चन समाजाचे आहेत. त्यामुळे नाताळ सणाच्या पूर्वीच सुखद वार्ता ऐकून गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केले. वागळे इस्टेट येथे संदीपकुमार गुप्ता यांनी शिवाजंली अग्रीटेक नावानी कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून कृषी उत्पन्न घेण्यात येणार आहे.

Loksatta explained What are the reasons for the fall of the rupee against the dollar and what are its consequences
गेल्या १० वर्षांत २८.३ टक्के घसरण… डॉलरपुढे रुपयाची घसरण आणखी कुठपर्यंत? कारणे काय? परिणाम काय?
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
fraud of 21 lakhs by promising huge investment returns
नवी मुंबई : गुंतवणुकीतून भरघोस परताव्याचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक 
During the financial year the market value of 80 companies exceeded lakhs of crores
सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे

हेही वाचा: कल्याण: आंबिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासनिसावर प्रवाशाचा प्राणघातक हल्ला

या कंपनीत पैसे गुंतविल्यास वार्षिक १५ टक्के व्याज मिळेल तसेच गुंतणूकदार हे कंपनीचे भागीदार होणार असल्याचे कंपनीने म्हटले. त्यामुळे मुंबई, पुणे येथील २० गुंतवणूकदारांनी ऑगस्ट २०१७ ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीत कंपनीत १ कोटी ४१ लाख १० हजार रुपये गुंतविले होते. यातील बहुतांश गुंतवणूकदार हे ६० वर्षांपुढील आहेत. वर्ष उलटत असतानाही व्याज मिळत नव्हते. त्यामुळे २०२० मध्ये गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे, संदीपकुमार गुप्ता याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा: डोंबिवलीत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तोतया अधिकाऱ्यांनी उद्योजकांकडून उकळली खंडणी; एकाला अटक

याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. पोलिसांनी कंपनीच्या बँक खात्याची माहिती घेऊन त्यांचे बँक खाते तात्काळ गोठवले. त्यामुळे बँक खात्यातील गुंतवणूकदारांची रक्कम संरक्षित झाली. नुकतेच याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार या गुंतवणूकदारांना धनाकर्ष देण्यात आले आहेत. गुंतवणूकदार हे ख्रिश्चन समाजातील आहे. गुंतवलेली १०० टक्के रक्कम परत मिळणार असल्याची वार्ता नाताळ सणापूर्वीच मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.