ठाणे : मला मंत्रीपदासाठी विचारणा करण्यात आली होती. परंतु एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री असतील तर त्या मंत्रिमंडळात मला मंत्री किंवा राज्यमंत्री पदही नको, अशी स्पष्ट भूमिका शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी घेतली. तसेच आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे म्हटले.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर मतदारसंघाचे दौलत दरोडा हे आमदार आहेत. सोमवारी त्यांनी शरद पवार यांच्यासोबत असल्याची भूमिका स्पष्ट केली. अजित पवार हे नेते असल्याने त्यांनी मला संपर्क साधल्यानंतर मी बैठकीला गेलो. नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वागलो. मला मंत्रीपदाची विचारणा करण्यात आली होती. परंतु एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री असतील तर त्या मंत्रिमंडळात मला मंत्री किंवा राज्यमंत्री पदही नको, असे दौलत दरोडा म्हणाले. तसेच शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीसही मी उपस्थित राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विकास झाला पाहिजे परंतु पक्षसुद्धा टिकला पाहिजे. त्यामुळे शरद पवार यांनी दिलेला आदेश आम्हाला मान्य असेल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “अजून बऱ्याच जणांच्या विकेट काढायच्या आहेत”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सूचक विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालघरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच विक्रमगड मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा यांनीही आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे.