डोंबिवली- डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकातील विष्णुनगर आणि पंडित दिनदयाळ चौकासमोरील रेल्वे तिकीट खिडक्यांच्या समोरील मोकळ्या जागेत रेल्वे कर्मचारी, पोलीस यांची दुचाकी वाहने उभी करुन ठेवण्यात येतात. गर्दीच्या वेळेत या तिकीट खिडक्यांसमोरुन जाताना प्रवाशांना वळणे घेऊन जावे लागते. रेल्वे स्थानकात दररोज २५ ते ३० वाहने उभी राहत असताना रेल्वे प्रशासनाकडून या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत नसल्याने प्रवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर भागातील रेल्वे प्रवेशव्दाराच्या आतील भागात रेल्वे कर्मचारी, मुंबई परिसरात नोकरीला जाणारे कर्मचारी रेल्वे स्थानकातील मोकळ्या जागेत बिनधास्तपणे दुचाकी वाहने आणून उभी करतात. एका वाहन मालकाने तर घराजवळ वाहन ठेवण्यासाठी जागा नाही म्हणून आपली भंगार झालेली दुचाकी रेल्वे स्थानकात अनेक महिने आणून ठेवली आहे. ही वाहने रेल्वे स्थानकात उभी करुन ठेवण्यात येत असल्याने तेथे रेल्वे सफाई कर्मचाऱ्यांना सफाई करता येत नाही, अशा तक्रारी आहेत.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल

रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, लोहमार्ग पोलीस यांना रेल्वे स्थानकात तयार झालेले वाहनतळ दिसत नाहीत का. संशयास्पद पध्दतीने कोणी अशा ठिकाणी दुचाकी आणून ठेवली आणि काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत. या दुचाकी वाहनांचा आधार घेऊन अनेक प्रवासी विशेषता तरुण, तरुणी या दुचाकींवर बसून गप्पा मारत बसतात, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या.

हेही वाचा >>>मीरा रोड रेल्वे स्थानकात रिक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन महिन्यापूर्वी ‘लोकसत्ता’ने अशा प्रकारचे वृत्त देताच रेल्वे प्रशासनाने रेल्वे आरक्षण केंद्राबाहेरील दुचाकी बाहेर काढल्या होत्या. डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचे प्रशस्त वाहनतळ आहे. त्या ठिकाणी दरमहा भाडे भरायला नको म्हणून रेल्वे कर्मचारी, पोलीस रेल्वे स्थानकात आणून वाहने उभी करत असल्याचे कळते.