डोंबिवली : मागील आठ वर्षांपासून फेरीवाला मुक्त प्रभाग असलेल्या डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागातील वर्दळीच्या रस्त्यावर फेरीवाल्याचे अतिक्रमण वाढू लागले असून याठिकाणी फेरीवाल्यांनी लावलेल्या रसवंती, शिव वडापावच्या हातगाड्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छबी झळकत आहे. तसेच या हातगाड्यांवर पालिकेने कारवाई करू नये, म्हणून एका वजनदार लोकप्रतिनिधीच्या स्वीय साहाय्यकाने अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याची चर्चा आहे. दरम्यान तक्रारी येऊनही अधिकारी कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

शहरातील प्रसिध्द नाख्ये उद्योग समुहाच्या मालमत्तेसमोर फेरीवाल्यांनी बेकायदा बस्तान मांडले आहे. या फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नाख्ये उद्योग समुहाचे संचालक, श्री मारूती मंदिर सेवा ट्रस्टच्या अध्यक्षांनी पालिका आयुक्त, ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिला आहे.

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
BJP Retain Support uttam jankar, madha lok sabha seat, uttam jankar, dhairyasheel mohite patil, NCP sharad pawar group, devendra fadnavis, amit shah,
माढ्यात नुकसान नियंत्रणासाठी देवेंद्र फडणवीस सरसावले, नाराज उत्तम जानकरांना विशेष विमानाने मुंबईत पाचारण
cm eknath shinde, cm eknath shinde convoy stopped
रेल्वेने अडविला मुख्यमंत्र्यांचा ताफा
Steel Benches on Dombivli Railway Station with courtesy of Srikant Shinde
डोंबिवली रेल्वे स्थानकात ‘बाकड्यांच्या’ माध्यमातून खासदार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार

हेही वाचा : ठाणे पल्ल्याडच्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

पालिकेच्या ह प्रभागातील डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसर मागील आठ वर्षापूर्वीच फेरीवाला मुक्त करण्यात आला आहे. परंतु हातगाड्यांच्या अतिक्रमणामुळे अनेक वर्ष फेरीवाला मुक्त असलेला हा परिसर पुन्हा फेरीवाल्यांच्या विळख्यात जाण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

शिव वडापावचा शिरकाव

डोंबिवली पश्चिमेत पंडित दिनदयाळ रस्त्यावर व्दारका हाॅटेल जवळील स्कायवाॅक खाली, रेल्वे स्थानकापासून १५० मीटरच्या आत गेल्या आठवड्यात रात्रीच्या वेळेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांची प्रतीमा असलेली शिववडा पावची हातगाडी आणून ठेवण्यात आली आहे. अशाच पध्दतीने जोंधळे हायस्कूल समोरील वळण रस्त्यावर पदपथ अडवून एक रसवंती दुकान सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही हातगाड्या वर्दळीच्या रस्त्यावर, पादचाऱ्यांच्या, वाहनांच्या येण्याच्या जाण्याच्या मार्गात आहेत. या हातगाड्यांवर पालिकेने कारवाई करू नये, म्हणून एका वजनदार लोकप्रतिनिधीच्या स्वीय साहाय्यकाने अधिकाऱ्यांवर दबाव टाकला असल्याचे पालिका कर्मचारी सांगतात. या बेकायदा हातगाड्यांविरुध्द पालिकेत तक्रारी येऊनही ह प्रभाग अधिकाऱ्यांना कारवाई करता येत नसल्याचे समजते.

हेही वाचा : मेट्रो कारशेड व मार्गीकेबाबत नगरविकास विभागाकडे जवळपास पाचशे हरकती दाखल

भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी या टपऱ्या हटविल्याच पाहिजेत, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. धात्रक यांनी यासंदर्भात आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, साहाय्यक आयुक्त स्नेहा करपे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. प्रत्येक जण रेल्वे स्थानक भागात टपऱ्या लावण्यास सुरूवात करील. पश्चिम परिसर फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकेल. या दोन्ही टपऱ्या तातडीने उचलण्यात याव्यात, अशी मागणी माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी केली आहे. रिक्षा चालक, प्रवासी, व्यापाऱ्यांनी या हातगाड्यांवरून नाराजी व्यक्त केली आहे. फेरीवाल्यांच्या लावण्यावरूनही आता राजकीय मंडळींचे स्वीय साहाय्यक हस्तक्षेप करून लागल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा : मुंब्रा येथील बेकायदेशीर शाखेला अधिकाऱ्यांचे अभय, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

“ डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाच्या १५० मीटरच्या आत गेल्या आठवड्यापासून फेऱीवाल्यांच्या हातगाड्या लावण्यात आल्या आहेत. पालिकेने या हातगाड्या हटविल्या नाहीतर पालिके विरूध्द कायदेशीर कारवाई करू.” – संचालक, नाख्ये उद्योग समूह, डोंबिवली.

“या हातगाड्यांविषयी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रसवंती चालकाने कागदपत्र सादर केली आहेत. त्याची छाननी केली जात आहे. एका हातगाडीविषयी स्थानिक नगरसेवकाने तक्रार केली आहे. योग्य नियोजन, पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाई केली जाईल.” – स्नेहा करपे, सहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.