scorecardresearch

Premium

मुंब्रा येथील बेकायदेशीर शाखेला अधिकाऱ्यांचे अभय, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

मुंब्रा येथील बेकायदा शाखेची पुर्नबांधणीच अनधिकृत असून सरकारी वरदहस्ताने ही कामे सुरू आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

MLA Jitendra Awads allegation there is Support of authorities to the illegal shivsena shakha in Mumbra
यासंदर्भाचे ट्विट त्यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर केले आहे. (फोटो- संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मुंब्रा येथील बेकायदा शाखेची पुर्नबांधणीच अनधिकृत असून सरकारी वरदहस्ताने ही कामे सुरू आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यासंदर्भाचे ट्विट त्यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर केले आहे. याच शाखेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे हे स्वत: मुंब्रा येथे आले होते. आव्हाड यांच्या ट्विटमुळे शाखेचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Proactive action against accused in Sharad Mohol murder case pune news
शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का कारवाई; मुख्य सूत्रधार गणेश मारणेचा शोध सुरूच
Narayan Rane Devendra Fadnavis
मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवर राणे-भुजबळांचा आक्षेप, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सरकारने घेतलेला निर्णय…”
Jitendra Awhada Post video
“सरकार मराठा बांधवांच्या भावनांशी क्रूर खेळ करते आहे”, ‘त्या’ कर्मचाऱ्याचा व्हिडीओ पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांचा आरोप
Police bravery medal gadchiroli
गडचिरोली : नक्षल्यांशी मुकाबला करणाऱ्या १९ जवानांना पोलीस ‘शौर्य’ पदक, सोमय मुंडेंना राष्ट्रपती पदक

मुंब्रा येथे शिवसेनेची मध्यवर्ती शाखा होती. या शाखेत ठाकरे गटाचे पदाधिकारी बसत होते. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने ही शाखा जमीनदोस्त केली होती. ही शाखा गुंडगिरी करत शिंदे गटाकडून बळकावली असा आरोप ठाकरे गटाने केला होता. तर या ठिकाणी शाखेची पूर्नबांधणी केली जाणार असल्याने ती पाडण्यात आल्याचा दावा शिंदे गटाने केला होता. सध्या या ठिकाणी एका कंटेनरमध्ये शाखा सुरू करण्यात आली आहे. या कंटेनरमध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी बसू लागले आहेत. तर जमीनदोस्त केलेल्या शाखेच्या जागेवर नव्याने शाखा उभारली जात आहे.

शाखा जमीनदोस्त केल्याने उद्धव ठाकरे हे थेट मुंब्रा येथील शाखेत आले होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील त्यांच्यासोबत होते. या जागेभोवती शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही ठाण मांडली होती. त्यामुळे दोन्ही गट समोरा-समोर आल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, या शाखेच्या पूर्नबांधणीविषयी आव्हाड हे समाजमाध्यमाद्वारे प्रशासनावर टिकेची झोड उठविली जात आहे.

आणखी वाचा-ठाण्यात आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

बुधवारी आव्हाड यांनी एक्स या समाजमाध्यमावरून प्रशासनावर टिका केली. तसेच काही चित्रीकरणही पाठविले आहे. ‘मुंब्र्यातील बळकावलेल्या शाखेच्या पूर्नबांधणीचे अनधिकृत काम हे सरकारी वरदहस्ताने किती जोरात सुरू आहे, याचा व्हिडिओ मी पुन्हा पोस्ट करत आहे. सदरील शाखा बळकावली, ती तोडली आणि त्यावर आता पुन्हा एकदा पूर्नबांधणी सुरू असल्याचे सर्व व्हिडिओ मी लागोपाठ समाजमाध्यमावर पाठवित आहे. या सर्व प्रकरणाचा संबंध मुख्यतः पोलिसांशी, पालिका प्रशासनाशी आणि जिल्हाधिकऱ्यांशी येतो. परंतु हे तिन्ही महत्वाचे घटक आणि त्यासोबत संबंधित असणारे अधिकारी डोळे मिटून गप्प बसले आहेत असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ठाण्यातील इतर भागात मात्र हेच अधिकारी एखाद्या अनधिकृत बांधकामाला थांबविण्याच्या सूचना देत आहेत, पाडण्याच्या सूचना देत असतात. जी चांगलीच गोष्ट आहे. परंतु मुंब्ऱ्यातील या शाखेबाबत जो काही गैरप्रकार सुरू आहे, त्याला मात्र हे अधिकारी का अभय देत आहेत? याचे कारण मात्र समजत नाहीये. आज मी पुन्हा एक व्हिडिओ टाकतो आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी..! असेही त्यांनी म्हटले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mla jitendra awads allegation there is support of authorities to the illegal shivsena shakha in mumbra mrj

First published on: 29-11-2023 at 19:42 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×