डोंबिवली : डोंबिवली परिसरातील बेकायदा ढाबे चालकांविरुध्द कारवाई करावी, या मागणीसाठी डोंबिवली हाॅटेल्स ओनर्स असोसिएशनने गुरूवारी (ता.२८) डोंबिवलीतील हाॅटेल्स आणि परमिट रूम एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बेकायदा ढाबे चालकांमुळे हाॅटेल व्यवसायावर आर्थिक परिणाम होत आहे. शासनाचे सर्व नियम पाळूनही व्यवसायात आर्थिक झळ सोसावी लागत असल्याची खंत येथील हाॅटेल्स व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

डोंबिवली परिसरात एकूण ८० हून अधिक परवानाधारी हाॅटेल्स आणि परमिट रूम आहेत. दरवर्षी हे परवानाधारी हाॅटेल व्यावसायिक सुमारे आठ लाख रूपयांचे शुल्क भरणा करून हाॅटेल परवान्याचे नुतनीकरण करून घेत आहेत. या कर शुल्क भरण्याच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न अलीकडे हाॅटेल व्यावसायिकांना मिळत नाही. याला मुख्य कारण डोंबिवली शहर परिसरात उभे राहिलेले बेकायदा ढाबे आहेत, असे हाॅटेल व्यावसायिकांनी सांगितले.

CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : सत्तेच्या राजकारणात व्यवसायाचे नुकसान
mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास

हेही वाचा : कल्याण लोकसभेसाठी माजी आमदार सुभाष भोईर इच्छुक, समर्थकांची जोरदार तयारी

या ढाब्यांंमधून नियमबाह्य मद्य, खाद्य पदार्थ विकली जातात. या ढाबे चालकांकडे कल्याण डोंबिवली पालिका किंवा उत्पादन शुल्क विभागाचा कोणताही परवाना नसतो. स्थानिक चार ते पाच जण येऊन सरकारी, पालिकेच्या राखीव भूखंड किंवा मोकळ्या जागेत ढाबा सुरू करतात. या ढाब्यांमध्ये परवानाधारी हाॅटेल्समध्ये मिळणारे खाद्य पदार्थ, मद्य रास्त दरात ढाबे चालक विकतात. कमी पैशात भरपेट खाण्यास, पिण्यास मिळत असल्याने अनेक अनेक ग्राहक ढाब्यांकडे वळत आहेत. त्याचा परिणाम हाॅटेल व्यवसायांवर झाला आहे. दैनंदिन किंवा मासिक हाॅटेलचे ग्राहक सेवेतून मिळणारे उत्पन्न कमी झाले. कर्मचाऱ्यांचे वेतन, आणि इतर खर्च भागविणे अनेक हाॅटेल्स चालकांना अलीकडे अवघड होत आहे, अशा तक्रारी हाॅटेल व्यावसायिकांनी केल्या. ढाबे चालकांना कोणताही कर, सेवाशुल्क शासन, पालिकेला द्यावे लागत नाही. त्याचा गैरफायदा घेत ढाब्यांचे कल्याम, डोंबिवलीत पेव फुटले आहे.

डोंबिवली परिसरातील बेकायदा ढाबे चालकांविरुध्द कारवाई करावी. तेथील नियमबाह्य मद्य, खानपानसेवा बंद करण्यात यावी, या मागणीसाठी आपण गुरुवारी (ता.२८) डोंबिवलीतील हाॅटेल्स, परमिट रुम्स बंद ठेवत आहोत, असे डोंबिवली हाॅटेल्स ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. हा बंद शांततेत असेल, असे व्यावसायिकांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : कल्याण रेल्वे स्थानकात प्रवासी महिलेकडून दोन लाखांचा अपहार

२५० ढाबे

कल्याण डोंबिवली परिसरातील शिळफाटा, मलंगगड, काटई बदलापूर रस्ता, टिटवाळा, बारावे भागात परिसरात एकूण सुमारे २५० हून अधिक ढाबे आहेत. संध्याकाळी पाच ते पहाटेपर्यंत हे ढाबे सुरू असतात. या ढाब्यांना कल्याण डोंबिवली पालिकेने बाजार शुल्क परवानग्याच्या नियमात बसविण्याचे प्रयत्न पालिकेच्या बाजार परवाना विभागाकडून सुरू होते. परंतु, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी या ढाब्यांचा जागांचा प्रश्न, तेथील बांधकाम, कारवाई करण्यात आल्यानंतर निर्माण होणारे कायदेशीर प्रश्न, असे प्रश्न उपस्थित करून बाजार शुल्क परवाना विभागाचा शुल्क आकारणीचा प्रस्ताव गुंडाळला.

हेही वाचा : ठाणेकरांना तुर्तास जलदिलासा, सध्या तरी पाणी कपातीचा निर्णय नाही

विभागाची कारवाई

हाॅटेल व्यावसायिकांनी बेकायदा ढाब्यांच्या विरूध्द राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. या अधिकाऱ्याने डोंबिवलीतील बेकायदा ढाब्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन हाॅटेल्स व्यावसायिकांना दिले आहे.