डोंबिवली : डोंबिवली-घरडा सर्कलमार्गे- कल्याण रस्त्यावर खंबाळपाडा कमान येथे वर्दळीच्या सार्वजनिक रस्त्यावर गॅस सिलिंडरचा वापर करून पुरी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका विक्रेत्याविरुध्द टिळकनगर पोलिसांनी कारवाई केली आहे.

ज्वालाग्रही वस्तू सार्वजनिक ठिकाणी वापरून नागरिकांच्या जीवितास हानी होईल असे कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल टिळकनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीत दररोज संध्याकाळी सात ते रात्री उशिरापर्यंत अनेक विक्रेते पोत्यामध्ये गॅस सिलिंडर भरून तो सार्वजनिक रस्त्यावरील हातगाडीच्या ठिकाणी आणतात. त्या सिलिंडरच्या माध्यमातून चायनिज, पुरी, वडापाव विक्रेचे व्यवसाय करतात. कल्याण डोंबिवली पालिका प्रभागातील साहाय्यक आयुक्त, पोलिसांना अंधारात ठेऊन राजरोस हे प्रकार सुरू आहेत.

हे ही वाचा…पाच महिन्याच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या त्रिकुटास अटक; राबोडी पोलिसांनी चार तासात केली बाळाची सुटका

खंबाळापाडा कमान येथे कल्याण-डोंबिवली रस्त्यावरील टाटा पाॅवरकडे जाणाऱ्या पोहच रस्त्यावर एक इसम गॅस सिलिंडरचा सार्वजनिक रस्त्यावर वापर करून तळलेल्या पुरी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची तक्रार टिळकनगर पोलिसांना एका जागरूक नागरिकाकडून मिळाली. पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन तपासणी केली. त्यावेळी तेथे अंबरनाथ जवळील अरवली गावातील त्रिभुवन भरत पांडे (३०) हा इसम पुरी विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे दिसून आले. पुऱ्या तळण्यासाठी त्याने गॅस सिलिंडर आणि शेगडीचा वापर केल्याचे दिसून आले.

हे ही वाचा…ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारच्या ज्वालाग्रही वस्तू वापरण्यास प्रतिबंध आहे हे माहिती असुनही त्रिभुवन पांडे यांनी सिलिंडर रस्त्यावर ठेऊन त्याचा वापर केला म्हणून पोलिसांनी त्याचा सिलिंडर जप्त केला. त्रिभुवनवर हवालदार तुषार कमोदकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय नागरी सुरक्षा कायद्याने त्याला नोटीसही देण्यात आली. ९० फुटी रस्त्यावरील अनेक भागात, डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यावर रात्रीच्या वेळेत गॅस सिलिंडरचा वापर करून विक्रेते व्यवसाय करत आहेत.