डोंबिवली : डोंबिवली – ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान गुरूवारी सकाळी नऊच्या दरम्यान टिटवाळा-सीएसएमटी वातानुकूलित लोकलवर दोन गर्दुल्ल्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीत लोकलमधील एक महिला जखमी झाली. याप्रकरणी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार दाखल होताच, डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून दोन गर्दुल्ल्यांना अटक केली.

डोंबिवली, ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान टिटवाळा-छत्रपती शिवाजी महारा्ज टर्मिनस लोकल धावत असते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ही लोकल ठाकुर्ली ते डोंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत असताना ठाकुर्ली जवळ बाजुच्या वस्तीमधून एक दगड वातानुकूलित लोकलच्या खिडकीवर फेकण्यात आला. दगड वेगात फिरकावल्याने दगड काच फोडून खिडकीजवळ बसलेल्या एका महिलेला लागला. तिला किरकोळ जखम झाली. यावेळी काही वेळ लोकलमध्ये प्रवाशांची तारांबळ उडाली.

Water wastage due to leakage of Ransai Dam water channel
उरण : रानसई धरणाच्या जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणी वाया
two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
duronto express 60 lakh cash found marathi news
लांबपल्ल्यांच्या रेल्वेत सापडली ६० लाखांची रोकड
Change in train schedule due to night block at Vikhroli
विक्रोळीतील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

हेही वाचा : प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी कल्याण, डोंबिवलीत पालिका विद्यार्थ्यांच्या जनजागृती फेऱ्या

याप्रकरणाची तातडीने रेल्वे प्रशासनाला ट्वीटरच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. ही माहिती डोंबिवली लोहमार्ग, रेल्वे सुरक्षा बळाला देण्यात आली. पोलिसांनी तातडीने ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. यावेळी दोन गर्दुल्ले ठाकुर्ली जवळील वस्तीत रेल्वे मार्गालगत बसून दगडफेक करत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांचा ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक केली. त्यांच्यावर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी दिली.