डोंबिवली : येथील एका तरूणाची ऑनलाईन व्यवहारातून भामट्यांनी ३३ लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तरुणाच्या तक्रारीवरून माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याने बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. हेमांशु हर्षदकुमार शहा (४०, रा. विको नाका, एमआयडीसी, डोंबिवली) असे तक्रारदाराचे नाव आहे. गेल्या महिन्यात भामट्यांनी तक्रारदार हेमांशु यांना संपर्क साधला. त्यांना ऑनलाईन व्यवहारांची माहिती देऊन या व्यवहारात गुंतवणूक केल्यास झटपट दामदुप्पट पैसे मिळतील असे अमिष दाखविले. सुरुवातीला पैसे मिळत गेल्याने हेमांशु यांनी टप्प्याटप्प्याने एकूण ३३ लाख २८ हजार रुपये ऑनलाईन व्यवहारातून गुंतवणूक केले.

हेही वाचा : निवडणुकांपूर्वी मध्य प्रदेशात तयार होणारे अवैध अग्निशस्त्र ठाण्यात ?

Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
How does fraud on name of investment happen
विश्लेषण : गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक कशी होते? व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, टेलिग्राम संदेशांपासून सावध कसे राहावे?
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
5 Crore and 45 lakh embezzlement in Nandura Urban Bank
नांदुरा अर्बन बँकेत साडेपाच कोटींचा अपहार, कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन…

या गुंतवणुकीतून आकर्षक परतावा मिळणे आवश्यक होते. तो मिळणे बंद झाले. आकर्षक व्याज आणि मूळ रक्कम परत मिळावी म्हणून हेमांशु शहा भामट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. सुरूवातीला त्यांनी किरकोळ कारणे देऊन हेमांशु यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराला प्रतिसाद देणे बंद केले. आपणास भामट्यांनी फसविले याची खात्री पटल्यावर हेमांशु यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली. गेल्या वर्षभरात कल्याण, डोंबिवली परिसरात ऑनलाईन माध्यमातून फसवणुकीचे सुमारे १०० हून अधिक गुन्हे घडले आहेेत. पोलीस उपनिरीक्षक पी. एस. गांगुर्डे तपास करत आहेत.