मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) उप प्रादेशिक कार्यालयातील उपनियोजक शिवराज प्रकाश पवार याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २४ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. जमीन विकसित करण्यासाठी झोन प्रमाणपत्र देण्याकरिता त्याने ही लाच घेतल्याची बाब कारवाईतून समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यातील तक्रारदार यांच्या ओळखीच्या दोन व्यक्तींना जमिनीचे विकसित करण्यासाठी झोन प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ठाणे उप प्रादेशिक कार्यालयातील उपनियोजक शिवराज प्रकाश पवार याने प्रत्येकी १२ हजार याप्रमाणे २४ हजारांची लाच मागितली होती. या प्रकरणी तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी या विभागाने त्या तक्रारीची पडताळणी केली असता, संबंधित अधिकाऱ्याने लाच मगितल्याचे समोर आले होते.

हेही वाचा : शिंदे गटाला मनसे रसद?; शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी हालचाली

त्यानंतर या विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी कार्यालयात सापळा रचून शिवराज पवार याला २४ हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक प्रमोद जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शिंदे,पोलीस हवालदार अभिजित पवार, सचिन गोसावी, जयश्री जोंधळे, पोलीस शिपाई त्रिभुवन यांनी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In front of mmrda deputy planner officer arrested for bribe of 24 thousand in thane tmb 01
First published on: 02-09-2022 at 11:46 IST