कल्याण: शिवसेनेचे युवासेनेचे प्रदेश सचिव दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना आपल्या जीवाला धोका असल्याचे एक पत्र दिले आहे. या शीर्षक पत्राच्या शीर्षस्थानी कल्याण डोंबिवली पालिकेची नाममुद्रा आहे. पालिकेच्या नाममुद्रेचा दिपेश म्हात्रे यांनी नियमबाह्य वापर केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्याकडे केली.

कल्याण डोंबिवली पालिकेतील लोकप्रतिनिधी राजवट नोव्हेंबर २०२० मध्ये संपुष्टात आली आहे. त्यामुळे म्हात्रे पालिकेच्या कोणत्याही पदावर नाहीत. असे असताना पालिकेला अंधारात ठेऊन म्हात्रे यांनी स्वताच्या शीर्षक पत्रावर पालिकेची नाममुद्रा ठेऊन त्याचा गैरवापर केला आहे. अशाप्रकारे एखाद्या शासन संस्थेची नाममुद्रा त्या संस्थेला अंधारात ठेऊन वापरणे हे सर्वथा गैर आहे. आणि कायद्याचे उल्लंघन करणारे आहे, असे भाजपच्या पत्रात म्हटले आहे.

terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Brijbhushan Pazare warned about to commit suicide if he pressured to withdraw candidature
“उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्या करणार,” ब्रिजभूषण पाझारे यांचा इशारा
Thieves at ST station increase in incidents of theft from commuters during Diwali
एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट, दिवाळीत प्रवाशांकडील ऐवज चोरीच्या घटनांमध्ये वाढ
Union Home Minister Vigilance Medal to Police Inspector Ankush Chintaman
अंकुश चिंतामण, हेमंत पाटील यांना, केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक
Anil Deshmukh criticizes Ajit Pawar, Anil Deshmukh latest news, Ajit Pawar latest news,
अनिल देशमुखांची अजित पवारांवर टीका, म्हणाले, “ते फडणवीसांच्या मांडीवर बसल्याने आबांवर…”
Netizens Trolled Marathi actress Prajakta Mali, know
“फरसाण खायचं बंद कर”, ऑरा जपण्यासाठी प्राजक्ता माळी काय करते ऐकून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “गावात राहणारा माणूस…”
Pune Politics Ethics , Pune Politics, Mahatma Phule,
पूर्वसुरींच्या नैतिक राजकारणाचा वस्तुपाठ

हेही वाचा : शिवसेना युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांना जीवे ठार मारण्याची धमकी, फलकांवरुन जबाब देण्यासाठी शक्तिप्रदर्शन करत पोलीस ठाण्यात

स्वताच्या शीर्षक पत्रावर कल्याण डोंबिवली पालिकेची नाममुद्रा कायम ठेऊन समाजात स्वताची प्रतिष्ठा जपण्याचा आणि दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून म्हात्रेंकडून केला जात आहे. सरकारी मुद्रा किंवा सरकारी शिक्क्याचा बेकायदा वापर करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाईचे कायदे, शासन आदेश आहेत. शिवसेना पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी पालिकेची नाममुद्रा आपल्या शीर्षक पत्रावर कायम ठेऊन बेकायदेशीर कृत्य केले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेने त्यांच्या विरुध्द कायदेशीर करावी, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा : कल्याणमध्ये ज्योतिष पाहण्याच्या बहाण्याने केबल व्यावसायिकाला लुटले

आयुक्त डाॅ. जाखड यांची भेट घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, कल्याण लोकसभा भाजप अध्यक्ष शशिकांत कांबळे, जिल्हा सरचिटणीस नंदू परब, डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष समीर चिटणीस, पूर्व मंडल अध्यक्ष विशू पेडणेकर, मितेश पेणकर, बाळा पवार, दिनेश दुबे यांचा सहभाग होता. आयुक्तांनी या पत्राची दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे कांबळे यांनी सांगितले.