कल्याण : मुंबईकडून निघालेल्या गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बुधवारी सकाळी टिटवाळा रेल्वे स्थानक भागात बिघाड झाला. एक्सप्रेस जागीच खोळंबून राहिल्याने या एक्सप्रेसच्या मागे धावत असलेल्या कसारा लोकल आणि इतर एक्सप्रेस गाड्या शहाड, कल्याण रेल्वे स्थानक परिसरात खोळंबून राहिल्या.

सुमारे एक तास कसारा कडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरातून शहापूर, कसारा, आडगाव भागात नोकरी निमित्त जाणाऱ्या नोकरदारांचे यामुळे हाल झाले. बराच उशीर लोकल एकाच जागी खळंबून राहिल्याने प्रवासी संतप्त झाले. कल्याणमधून भाजीपाला घेऊन जाणारे किरकोळ विक्रेतेही लोकलमध्ये अडकून पडले.

हेही वाचा : आमच्यामध्ये कोणताही श्रेयवाद नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच गीतांजली एक्सप्रेसचे लोको पायलट, टिटवाळा रेल्वे स्थानकातील तंत्रज्ञ यांनी एकत्रितपणे इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू केला. मुंबईकडे जाणारी लोकल सेवा मात्र सुरळीत होती. इंजिन मधील बिघाड दुरुस्त होत नसल्याने अखेर कल्याण कारशेड मधून नवीन इंजिन आणून ते गीतांजली एक्सप्रेसला जोडण्याचा निर्णय रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतला.

हेही वाचा : कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईहून कसाराकडे जाणारी एक लोकल कल्याण रेल्वे स्थानकात या कालावधीत रद्द करण्यात आली. ही लोकल कल्याण स्थानकातूनच पुन्हा सीएसएमटीकडे रवाना करण्यात आली. या लोकांचा कल्याण रेल्वे स्थानकातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना अचानक लाभ झाला.