शहापूर: शहापूर येथे एका व्यक्तीच्या हत्येचा कट त्याच्या मेहूण्यानेच रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी राजन यशवंत हरड (३० रा. कुरुंद), पंकेश मधुकर शिंदे (३३ रा. आणे) व महेश मुकुंद चव्हाण (४० रा. भांडुप) यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून देशी बनावटीचे हातबाॅम्ब, जिलेटीन आणि डिटोनेटर जप्त केले. हत्या केल्यानंतर गोंधळ उडाल्यास या स्फोटकांचा त्यांच्याकडून वापर केला जाणार होता अशी गंभीर बाब प्राथमिक तपासात उघड झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई – नाशिक महामार्गावर शहापूर पोलीस गस्त घालतहोते. त्यावेळी येथील रातांधळे गावच्या हद्दीत तीन तरुण संशयास्पदरित्या पोलिसांना आढळून आले. तिघांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीच्या उत्तर दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी कळमगावमध्ये राहणारे प्रभाकर सासे यांची रस्त्यात गाठून त्यांची हत्या करण्यासाठी आल्याची कबूली दिली. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतली. त्यापैकी पंकेश हा प्रभाकर याचा मेहूणा असल्याची माहिती समोर आली. प्रभाकर हे बहिणीला मारहाण करत होते. तसेच प्रभाकर यांची वर्तणूक चांगली नसल्याने हत्येचा कट रचल्याचे पंकेश याने सांगितले.

हेही वाचा… ठाण्यात वर्षभरात कोट्यवधी रुपयांच्या ८५ आलिशान मोटारींची नोंदणी; ८ कोटी ९० लाख रुपयांची सर्वात महागडी मोटार

पोलिसांनी त्यांच्याकडून टेम्पो, दुचाकी, दोन चाकू, हातबॉम्ब, डीटोनेटर्स, जिलेटीनच्या कांड्या अशी घातक हत्यारे व स्फोटके जप्त केली असे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी केली. चाकू हल्ला केल्यानंतर गोंधळ झाल्यास स्फोटकांचा वापर केला जाणार होता अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In shahapur the murder of a person was hatched by his wife brother explosives weapons seized by police dvr
First published on: 08-01-2024 at 18:18 IST