ठाणे : वागळे इस्टेट येथील रामचंद्र नगर भागात नवरात्रोत्सवाची वर्गणी दिली नाही म्हणून एकाला कोयता दाखवून धमकवण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : टिटवाळा, शहाड रेल्वे स्थानकांचा अमृत योजनेतून विकास; टिटवाळा उड्डाण पुलाचे काम वर्षभरात पूर्ण
रामचंद्र नगर येथे ४८ वर्षीय व्यक्ती राहतात. त्यांनी नवरात्रोत्सवाची वर्गणी दिली नाही म्हणून मंडळाच्या सचिवांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यांनतर कोयता दाखवून त्यांना धमकावले. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.