ठाणे : येथील ठाणे जिल्हा सामान्य रूग्णालयात दोन वर्षीय मुलीची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. मुलीच्या डोळ्यांवर लेझर मशिनद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली असून या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून तिला दृष्टी देण्यात आली आहे. नाशिक येथील इगतपुरी परिसरात राहणाऱ्या दोन वर्षीय मुलीला दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हते. केवळ प्रकाशाची संवेदना तिला जाणवत होती. तिची डोळ्यांची तपासणी केली असता जन्मजात मोतीबिंदू असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, तिला ठाणे जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यापूर्वी शारीरिक तपासणी करण्यात आली. या मुलीवर आठवडाभर रुग्णालयात उपचार सुरू होते.

नुकतेच तिच्या डोळ्यांवर लेझर मशिनद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन वर्षाच्या मुलीच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू असल्याने शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक होते. ही शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज माहांगडे यांच्या मार्गदर्शाखाली पार पडली. भूलतज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, डॉ.रुपाली यादव यांच्या मदतीने तिच्या डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडली असल्याची माहिती नेत्र तज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.

n m joshi marg bdd chawl redevelopment
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास; दोन वर्षांत १२६० घरांचा ताबा देण्याचे म्हाडाचे आश्वासन
न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यावर भाजपचे लक्ष 

“लहान वयात मुलीच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदु असल्याने तिला केवळ प्रकाश संवेदना जाणवत होती. तिला भूल देऊन त्यानंतर शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक होते. मात्र नेत्रविभागातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी हे आव्हान यशस्वीपणे पार पाडले. तसेच सर्व डाॅक्टर आणि कर्मचारी हे रूग्णांची आत्मीयतेने सेवा करण्यासाठी प्रयत्नशील असतात.” – डॉ. कैलास पवार , जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे</p>