बदलापूरः २०१९ च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी गद्दारी केल्याने महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे आमदार किसन कथोरे यांचे मंत्रीपद हुकले. पण किसन कथोरे यांना मी आता शब्द देतो की तुम्ही लाखोंच्या मताधिक्याने निवडून या. तुम्ही राज्याच्या मंत्रिमंडळात असाल,’ असे सूचक वक्तव्य भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी केले. मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना आयोजीत सभेत तावडे बोलत होते. यावेळी किसन कथोरे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले.

मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी आज पाचव्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बदलापूर येथील निवासस्थानाहून निघल्यापासून मुरबाडपर्यंत प्रवासात त्यांना हजारोंच्या संख्येने समर्थक जोडले गेले. मुरबाड शहरात भव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी महायुतीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र शिवसेनेचे बदलापूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती दिसून येत होते. शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून लढण्याचे संकेत दिले आहेत. मात्र यावेळी बोलताना विनोद तावडे यांनी वामन म्हात्रे यांचे बंधू शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उद्देशून, पुढच्या वेळी वामन म्हात्रे पण सोबत हवेत असे म्हणाले. तसेच किसन कथोरे यांना लाखोंच्या मताधिक्याने निवडून द्या, ते तुम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळात दिसतील, असेही तावडे यावेळी म्हणाले. तर मला माझाच विक्रम मोडायचा आहे, असे किसन कथोरे म्हणाले. तसेच आता गटातटाचे उद्योग थांबले. माझा संघर्ष कुणाशी नाही फक्त विकासाशी संघर्ष आहे. तुमचा आमदार कधीही ठेकेदार झाला नाही. विरोधी पक्षांना उमेदवार मिळाला आहे की ठेकेदार असा टोलाही यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार सुभाष पवार यांना लगावला.

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात बंडोबांना थंड करण्याचे महायुतीपुढे आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चारशे पार भोवले

लोकसभा निवडणुकीत चारशे पार भोवले. त्यामुळे यंदा गाफील राहू नका. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन विनोद तावडे यांनी केले. मात्र यावेळी चारशे पारचा नारा फसल्याची कबूली दिली.