ठाणे – घोडबंदर येथील गायमुख भागात सोमवारी सकाळी एका कंटेनरच्या केबिनला अचानक आग लागल्याची घटना घडली. कंटेनर पेट घेत असताना वाहन चालकाने वाहन सोडून पलायन केले. कंटेनरचे केबिन पुर्णपणे जळाले असून या घटनेत कोणतीही जीवित्तहानी झालेली नाही.

हरियाणावरून नवी मुंबई येथे जाण्यासाठी घोडबंदर मार्गे कंटेनर चालक वाहतुक करत होता. यावेळी या कंटेनर मधुन २० टन प्लायवूडची वाहतुक केली जात होती. सोमवारी सकाळी ६.२१ वाजताच्या सुमारास चालक कंटेनरने गायमुख येथील सी.एन.जी. पंप जवळ आला असता, कंटेनर मधून अचानक धूर येऊ लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहन चालकाने तात्काळ कंटेनर रस्त्यालगत उभी करून तेथून पलायन केले. त्यानंतर अवघ्या काही क्षणात कंटेनरने पेट घेतला. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल, वाहतुक पोलिसांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवत परिस्थिती नियंत्रणात आणली.