ठाण्यातील आंतरराष्ट्रीय सी. पी. गोएंका शाळेत मुलांवर झालेल्या विनयभंगानंतर गुरुवारी पालकांनी शाळेसमोर शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन केले. तसेच प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. कापुरबावडी भागात ‘सी. पी. गोएंका इंटरनॅशनल स्कूल’ ही शाळा आहे. या शाळेतील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचे घाटकोपर येथील एका थीम पार्कमध्ये सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १ हजार ६०० रुपये घेण्यात आले होते.

हेही वाचा : कल्याण रेल्वे स्थानकात स्फोटके सापडली, आरोपींचा शोध सुरू

एका खासगी कंपनीच्या बसगाड्यांमधून विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेले जात होते. मंगळवारी एकूण चार बसगाड्या या सहलीसाठी निघाल्या. या बसगाडीपैकी एका बसगाडीत जावेद खान हा सेवक (अटेन्डन्ट) म्हणून होता. बसगाडीमध्ये खाद्य पदार्थाची पाकिटे वाटत असताना, जावेद याने काही मुला-मुलींचा विनयभंग केला होता. गुरुवारी सकाळपासून पालक शाळेबाहेर जमले होते. पालकांचे प्रतिनिधी आणि शाळा प्रशासनाची चर्चा सुरू आहे. तसंच आज अनेक पालकांनी पाल्याला शाळेत पाठवलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.