ठाणे : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने २ लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार असे या अधिकाऱ्याचे नाव असून पोलीस ठाण्यात सापळा रचून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : महिलेच्या पोटातून एक किलो वजनाचा मासाचा गोळा काढला, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया

नारपोली पोलीस ठाण्यात शरद पवार हे कार्यरत आहे. तक्रारदार यांच्या मुलावर हत्येचा गुन्हा दाखल असून या प्रकरणात त्यांच्या मुलावर दोषारोपत्र दाखल आहे. या प्रकरणात तक्रारदार यांच्या मुलाला मदत करण्यासाठी शरद पवार याने तक्रारदार यांच्याकडून पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती दोन लाख रुपये देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली. मंगळवारी दुपारी पथकाने त्यांच्या कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून दोन लाख रुपये घेताना शरद पवार याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.