ठाणे : ठाण्यातील सिने-गाॅग या ज्यू धर्मियांच्या धर्मस्थळाला बाॅम्बने उडविण्याचा ई-मेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी टेंभीनाका, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील रस्ते बंद केले. याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात ज्यू धर्मियांचे सिने-गाॅग हे धर्मस्थळ आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून या धर्मस्थळामध्ये ज्यू धर्मीय प्रार्थनेसाठी येत असतात. गुरुवारी या धर्मस्थळाला बाॅम्ब स्फोट करून उडविण्याच्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता.

हेही वाचा : ठाणे : मद्यपींना घरी पोहचविण्याची जबाबदारी बार मालकांची

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिमंडळ एकचे उपायुक्त गणेश गावडे, ठाणेनगर, नौपाडा पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेची पथके दाखल झाली. त्यांनी परिसरातील रस्ते बंद केले आहेत. तसेच नागरिकांनाही याठिकाणी फिरकू दिले जात नव्हते. आजूबाजूच्या इमारतीतील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात आले होते. दरम्यान, तपासानंतर धर्मस्थळाच्या परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेने धर्मस्थळाच्या ठिकाणी सुरू असलेले शोध कार्य थांबवले आहे.