ठाणे : घोडबंदर येथील पातलीपाडा पूलाजवळ गुरुवारी सकाळी तेल वाहून नेणारा टँकर उलटला. या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर पातलीपाडा ते मानपाडा पर्यंत वाहतुक कोंडी झाली आहे. टँकरला रस्त्याच्या बाजूला करण्यात आले असले तरी रस्त्यावर तेल सांडल्याने कोंडीत वाढ होत आहे. कोल्हापूर येथून गुजरात येथील वापीच्या दिशेने वंगण तेलाचा टँकर वाहतुक करत होता. टँकरमध्ये २७. ८२९ लीटर वंगण तेल होते. हा टँकर गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास पातलीपाडा उड्डाणपूलाजवळ आला असता, टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टँकर उलटला. त्यामुळे टँकरमधील तेल रस्त्यावर पसरले.

हेही वाचा : ठाण्यात पदोपदी मृत्यूचे सापळे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि वाहतुक पोलिसांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाले. टँकरला हायड्रा यंत्राच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. परंतु तेल सांडल्याने मार्गावर पातलीपाडा ते मानपाडा पर्यंत वाहतुक कोंडी झाली आहे. कोंडीचा परिणाम बोरीवली, कासारवडवली, घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांना सहन करावा लागत आहे.