ठाणे : येथील शिवाजीनगर भागातील एका घरात २६ वर्षीय महिलेचा अर्धनग्न आणि कुजलेल्या अवस्थेत मृतदेह रविवारी पहाटे आढळल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेच्या मृतदेहाचे जे.जे रुग्णालयात शव परिक्षण करण्यात आले असून त्यात शस्त्राने छातीवर आणि गळ्यावर जखमा झाल्यामुळे या महिलेचा मृत्यु झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे. यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

प्रियंका गोकुळ तायडे उर्फ कोळी (२६) असे मृत महिलेचे नाव असून ती शिवाजीनगर भागात एकटीच राहत होती. तिचे चार वर्षांपुर्वी लग्न झाले होते. ती ठाण्यात एका माॅलमध्ये काम करीत होती. तर तिचा पती फर्निचरचे काम करीत होता. त्याने लग्नानंतर काम सोडून दिले होते. यामुळे त्या दोघांचे एकमेकांशी पटत नव्हते. तिचा पती आजारी झाल्यानंतर तो गावाकडे निघून गेला. वर्षभरापुर्वी दोघे विभक्त झाले. तसेच या महिलेचे गावातील एका तरुणासोबत लग्नापुर्वी प्रेमसंबंध होते. परंतु त्याच्या संशयी वृत्तीमुळे तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. यामुळे तो तिला त्रास देत असल्याचे तिने कुटूंबियांना सांगितले होते. तसेच ३ जुलैपासून तीचा फोन बंद येत होता, असे तिच्या वडिलांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा :बनावट सिमकार्डद्वारे बँकेची कर्ज वसुली, ठाणे पोलिसांनी केली तीनजणांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियंकाचे घर बाहेरून बंद असून घरातून दुर्गंधी येत होती. याबाबत श्रीनगर पोलिसांनी ७ जुलैला तिच्या वडिलांना कळविले. यानंतर त्यांनी घराचे कुलूप तोडून आत जाऊन पाहाणी केली असता, घरात प्रियंकाचा मृतदेह अर्धवट कुजलेला आणि अर्धनग्न अवस्थेत असल्याचे आढळून आले. तिच्या कानातील आणि पायातील आभुषणावरून ती प्रियंका असल्याची ओळख पोलिसांनी पटविली. मृतदेहाचे जे.जे रुग्णालयात शव परिक्षण करण्यात आले असून त्यात शस्त्राने छातीवर आणि गळ्यावर जखमा झाल्यामुळे या महिलेचा मृत्यु झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.