डोंबिवली: डोंबिवली शहराच्या विविध भागात, उच्चभ्रू वस्ती मधील बंद घरे फोडून चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने डोंबिवलीतील नागरिक अस्वस्थ आहेत. ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील सोसायट्यांमध्ये चोरट्यांचा वावर सुरू झाला आहे.

नोकरदार वर्ग या प्रकाराने नाराजी व्यक्त करत आहे. ठाकुर्ली खंबाळपाडा भागातील ९० फुटी रस्त्यावरील साईराज पार्क भागातील रहिवासी गौरव कळस्कर हे रविवार ते बुधवार या कालावधीत काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. या कालावधीत त्यांच्या घराचा बंद दरवाजाचा कडीकोयंडी तोडुन चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील कपाटातील ५३ हजार रूपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. घरी परतल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा… ठाण्यात आजपासून पं. राम मराठे संगीत महोत्सवाची नांदी

सोनारपाडा येथील पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या बाजुला ललितकुमार कामती (३३) यांचे वाहन दुरुस्तीचे दुकान आहे. चोरट्यांनी रात्रीच्या वेळेत या दुकानाच्या छतावरील पत्रा काढून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील धातूचे सुटे भाग, रोख रक्कम असा एकूण ६८ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. कामती यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा… ठाणे ते टिटवाळा दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३११ रेल्वे प्रवाशांवर कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वयंपाक बनविण्यासाठी लागणारी भांडी भाड्याने पुरवठा करणाऱ्या उसरघर गावातील सागर संते यांच्या खानपान सेवा दुकानातील ६४ हजार रूपयांची भांडी चोरट्यांनी रात्रीच्या वेळेत चोरून नेली. उसरघऱ येथे भांडी ठेवलेल्या गोदामाच्या बाहेर सीसीटीव्ही होते. चोरट्यांनी पहिले सीसीटीव्ही काढून घेतले. मग चोरी केली, असे बालाजी खानपान सेवेचे मालक सागर संते यांनी तक्रारीत म्हटले आहे.