scorecardresearch

दहीहंडी निमित्ताने शहरात अंतर्गत वाहतूक बदल

गोविंदा पथकांच्या वाहनांना अतंर्गत मार्गांवर प्रवेशबंदी असेल. त्यांची वाहने पूर्व द्रुतगती महामार्गावर उभी करता येऊ शकतील.

दहीहंडी निमित्ताने शहरात अंतर्गत वाहतूक बदल
(संग्रहित छायाचित्र)

ठाणे : दहीहंडी निमित्ताने शुक्रवारी ठाणे वाहतूक पोलिसांनी अंतर्गत बदल लागू केले आहेत. त्यानुसार, शहरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे. तसेच गोविंदा पथकांच्या वाहनांनाही शहरातील अंतर्गत मार्गावर येण्यास प्रवेश बंदी असणार आहे. गोविंदा पथकांची वाहने पूर्व द्रुतगती मार्गाच्या सेवा रस्त्यावर उभी केली जातील.

दहीहंडी निमित्ताने शुक्रवारी मुंबई, ठाण्याहून गोविंदा पथके ठाणे शहरात येत असतात. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी शहरात वाहतूक बदल लागू केले आहेत. तसेच गोविंदा पथकांनाही त्यांची वाहने उभी करण्यासाठी जागा नेमून दिली आहे. पथकांच्या वाहनांना शहरातील अंतर्गत मार्गावर प्रवेशबंदी असेल.

असे आहेत वाहतूक बदल

१) पूर्व द्रुतगती महामार्गावरून कोपरी रेल्वे पूल, तीन हात नाका, धर्मविरनगर नाका- नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन नाका येथून ठाणे शहरात येणाऱ्या गोविंदा पथकांच्या वाहनांना अतंर्गत मार्गांवर प्रवेशबंदी असेल. त्यांची वाहने पूर्व द्रुतगती महामार्गावर उभी करता येऊ शकतील.

२) पूर्व द्रुतगती महामार्गावरून कोपरी, तीनहात नाका, नितीन कंपनी येथून वंदना बसथांबा मार्गे ठाणे शहराच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्या, टीएमटी बसगाड्या, बेस्ट आणि खासगी बसगाड्यांना येथील कोपरी, तीन हात नाका, नितीन कंपनी चौकातून प्रवेश करण्यास तसेच ठाणे स्थानक येथून संबंधित चौकाच्या दिशेने वाहतूक करण्यास प्रवेश बंदी असेल. येथील वाहने कॅडबरी जंक्शन, खोपट नाका, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जांभळी नाका, भाजी मंडई मार्गे वाहतूक करतील.

३) ठाणे रेल्वे स्थानक येथील सॅटीस पूलावरून टॉवर नाक्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या एसटी, टीएमटी बसगाड्यांना सॅटीस पूलावर प्रवेशबंदी असेल. या बसगाड्या सॅटीस पूलावरून दादा पाटील वाडी मार्गे, गोखले रोड येथूुन वाहतूक करतील.

४) पाचपाखाडी येथील ठाणे महापालिका मुख्यालय ते अल्मेडा चौक, ओपन हाऊस आणि ओपन हाऊस ते भक्ती मंदीर या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांना वाहने उभी करण्यास बंदी असेल. ५) टॉवरनाका, गडकरी रंगायतन, बोटींग क्लब, मासुंदा तलाव रोडच्या दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांना वाहने उभी करण्यास बंदी असेल.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या