ठाणे: सरन्यायाधीश झाल्यानंतर प्रथमच मुंबईत आलेल्या न्यायमूर्ती भूषण गवई यांनी महाराष्ट्रातील नोकरशाहीला शिष्टाचार पाळण्यावरून रविवारी कानपिचक्या दिल्या. देशाचे सरन्यायाधीश प्रथमच आपल्या मूळ राज्यात येत असताना त्यांच्या स्वागताला राज्याच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक किंवा मुंबईचे पोलीस आयुक्त यापैकी कुणीही हजर नसल्याबद्दल न्यायमूर्ती गवई यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकारवरून आव्हाड यांनीही संताप व्यक्त केला. राज्याचे मुख्य सचिव, D.G.P, आय.जी ,मुंबई पोलिस आयुक्त व इतर अधिकारी असे कोणीच उपस्थित नव्हते…. ही संकुचित मनोवृत्ती नाही तर काय आहे ? असा सवाल त्यांनी ट्वीटवर केला. तसेच जाता जात नाही त्याला जात म्हणतात असेही आव्हाड म्हणाले.न्यायमुर्ती गवई यांनी १४ मे रोजी ५२वे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला.
यानिमित्त महाराष्ट्र आणि गोवा वकील संघटनेतर्फे मुंबईत रविवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. परंतु त्यांच्या स्वागतास राज्याच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक किंवा मुंबईचे पोलीस आयुक्त यापैकी कुणीही हजर नव्हते, याबद्दल न्यायमूर्ती गवई यांनी नाराजी व्यक्त केली होती. आव्हाड यांनी ही सरकारवर आणि अधिकाऱ्यांवर आगपाखड केली. आव्हाड यांनी एक्स या समाजवाध्यावर ट्विट केले. आव्हाड म्हणाले, महाराष्ट्राचे सुपुत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस.भुषण गवई साहेब शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात आले …. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल ने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यात चीफ जस्टिस साहेबांनी जाहीरपणे इथल्या प्रशासनाला प्रोटोकॉल न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
राज्याचे मुख्य सचिव, D.G.P, आय.जी , मुंबई पोलिस आयुक्त व इतर अधिकारी असे कोणीच उपस्थित नव्हते…. ही संकुचित मनोवृत्ती नाही तर काय आहे ? माझा प्रशासनाला जाहीर सवाल आहे मराठी मातीचा मराठी अभिमानाचा गौरव महाराष्ट्राचे प्रशासन नाही करणार तर कोण करणार …? माफी कोण मागणार ? आणि हो जाता जात नाही त्याला जात म्हणतात असा उल्लेख देखील त्यांनी केला.