लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड हे स्वत:ला डॉक्टर म्हणतात. त्यांच्या डॉक्टरेट पदवीची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही करणार आहोत. कारण, कोणी प्रबंध लिहीले, कोण सहा महिने कुठे राहिले त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. आव्हाड यांची डॉक्टरेट बनावट आहे. आव्हाड हे खोटारडे आणि ढोंगी आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून देणार असा आरोप राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय साहाय्यक अभिजीत पवार यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. गुरुवारी ते पुन्हा शरद पवार गटात दाखल झाले. त्यावेळी आव्हाड आणि अभिजीत पवार यांनी नजीब मुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यास प्रत्त्युत्तर देण्यासाठी नजीब मुल्ला यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी ‌आव्हाड यांच्यावर टीका केली. आमदार जितेंद्र आव्हाड हे स्वत:ला डॉक्टर म्हणतात. त्यांच्या डॉक्टरेट पदवीची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही करणार आहोत असे नजीब मुल्ला म्हणाले.

आव्हाड यांचे स्वीय साहाय्यक अभिजीत पवार यांची पत्नी कोरम मॉलमध्ये असताना, त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून आव्हाड यांनी अभिजीत पवार यांना धमकाविले होते. धमकाविताना एका नेत्याचे नाव आव्हाड घेत होते. त्या नेत्याच्या नावाचा वापर करून आव्हाड दादागिरी करत असल्याचा आरोपही नजीब मुल्ला यांनी केला. आव्हाड यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. तुम्ही किती हत्या केल्यात, बलात्कार केले. याची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत असेही त्यांनी सांगितले. आव्हाड यांच्याकडे बंगला कुठून आला. त्या बंगल्याच्या प्रकरणात काय चुका आहेत?, बंगला मालकाला अद्याप तुम्ही पैसे दिले नाहीत, ईडी प्रकरणात चौकशी सुरू असलेला केडीया कोण याची सुद्धा चौकशी होणार आहे. बंगल्यातील अनधिकृत बांधकाम बाहेर निघणार असा आरोपही मुल्ला यांनी केला. युद्धाची सुरुवात झाली आहे. आता तुमच्या बाबतीतील सर्व प्रकरण बाहेर काढणार आहोत असा इशारा त्यांनी आव्हाड यांना दिला. यापुढे हत्येचा उल्लेख केला तर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आव्हाड यांच्या प्रत्येक अव्यवहाराची मागणी करणार असल्याचे आनंद परांजपे यांनी सांगितले. आमदार निधीतील अनेक कामे प्रशासकीय मान्यता नसताना करण्यात आली या प्रत्येक बाबीसाठी आम्ही लेखी तक्रार करणार असेही परांजपे म्हणाले. आम्ही यापूर्वी संयम बाळगला. परंतु आता जशास तशे उत्तर देणार असल्याचेही परांजपे म्हणाले.