वाशी, पनवेल आणि त्यानंतर कसारा रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीस म्हणून काम करुन प्रवाशांकडून विविध कारणांनी पैसे उकळणाऱ्या दोन बनावट तिकीट तपाणीसांना मध्य रेल्वेच्या मुख्य तिकीट तपासणीसाने कसारा रेल्वे स्थानकातून पोलिसांच्या साहाय्याने शुक्रवारी ताब्यात घेतले. हे बनावट तिकीट तपाणीस असल्याने कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>ठाणे : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून ३० हजारांचे लक्ष्य

कल्याण रेल्वे न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.मध्य रेल्वेचे मुख्य तिकीट तपासणीस संतोष त्रिपाठी हे कसारा रेल्वे स्थानकात शुक्रवारी लोकल, एक्सप्रेस मधून उतरणाऱ्या प्रवाशांचे तिकीट तपाण्याचे काम करत होते. त्यावेळी त्यांना कसारा रेल्वे स्थानकात एका बाजुला दोन तिकीट तपासणीस प्रवाशांचे तिकीट तपासत असल्याचे आढळले. सुरुवातीला हे एक्सप्रेसमधील तपासणीस असावेत असा विचार मुख्य तिकीट तपासणीस त्रिपाठी यांनी केला. ते त्यांच्या जवळ गेले. त्यावेळी त्रिपाठी यांना संशय आला. हे तिकीट तपासणीस नसावेत. त्यांच्या गळ्यातील तिकीट तपासणीसाची ओळखपत्र बोगस असल्याचे त्रिपाठी यांच्या निदर्शनास आले.

हेही वाचा >>> ठाणे : आनंदाश्रमासमोर शिवसैनिकांचा जल्लोष

दोन्ही बोगस तपासणीस त्रिपाठी यांच्याकडे न पाहत लोकल मधून उतरणाऱ्या, फलाटावरील प्रवाशांची तिकिटे तपासत होते. त्रिपाठी रेल्वे सुरक्षा बळाच्या पोलिसांसह या दोन तिकीट तपासणींसाजवळ गेले. त्यांनी त्यांची विचारपूस केली. तुमचे तपासणीसाचे कर्तव्य कोणत्या स्थानकांच्या दरम्यान असते. तुम्ही येथे अचानक कसे आले आहात. त्यावेळी बोगस तिकीट तपासणीसांनी आम्ही प्रशिक्षणार्थि तपासणीस आहोत. प्रवाशांशी कसे बोलायचे. विनातिकीट प्रवाशाशी कसे वागायचे. कसारा स्थानक पाहण्यासाठी आलो आहोत, अशी उत्तरे दिली. त्यावेळी हे बोगस तिकीट तपासणीस असल्याचे मध्य रेल्वेचे तपासणीस संतोष त्रिपाठी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्यांना आपल्या दालनात नेले. लोहमार्ग पोलिसांना ही माहिती देण्यात आली. त्यांना कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यावेळच्या चौकशीत ते बनावट तपासणीस असल्याचे स्पष्ट झाले.आपण नऊ दिवसांपासून वाशी, पनवेल, कसारा भागात हे काम करत होतो, अशी कबुली बनावट तिकीट तपाणीसांनी पोलिसांना दिली. त्रिपाठी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan bogus ticket check was arrested at kasara railway station amy
First published on: 24-09-2022 at 19:51 IST