सुदृढ आरोग्याचा संदेश देत सायकल स्वारांची कल्याण-गुजरात मोहीम,तीन दिवसात ४२० किमी अंतर पार | Kalyan Gujarat campaign of cyclists spreading the message of good health amy 95 | Loksatta

सुदृढ आरोग्याचा संदेश देत सायकल स्वारांची कल्याण-गुजरात मोहीम,तीन दिवसात ४२० किमी अंतर पार

सुदृढ आरोग्याचा संदेश देत कल्याण मधील ३५ ते ७१ वयोगटातील ११ सायकल स्वारांनी थंडीचा कडाका, दव याची पर्वा न करता ४२० किलोमीटरचे कल्याण ते गुजरात अंतर तीन दिवसात पार पाडले.

सुदृढ आरोग्याचा संदेश देत सायकल स्वारांची कल्याण-गुजरात मोहीम,तीन दिवसात ४२० किमी अंतर पार
सुदृढ आरोग्याचा संदेश देत सायकल स्वारांची कल्याण-गुजरात मोहीम

सुदृढ आरोग्याचा संदेश देत कल्याण मधील ३५ ते ७१ वयोगटातील ११ सायकल स्वारांनी थंडीचा कडाका, दव याची पर्वा न करता ४२० किलोमीटरचे कल्याण ते गुजरात अंतर तीन दिवसात पार पाडले.गुजरात मधील सरदार सरोवर प्रकल्पा जवळील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकात्मततेचा संदेश देणाऱ्या स्मारकापर्यंत सायकल स्वारांनी प्रवास केला.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील ३८ बेकायदा इमारतींमधील एक हजार सदनिकांचे खरेदी-विक्री व्यवहार रोखले

चालाल तर वाचाल, सायकल चालविणे हा सुदृढ शरीरासाठी व्यायामाचा उत्तम प्रकार आहे. प्रत्येक नागरिकाने सायकल चालविणे अलीकडे स्वीकारले पाहिजे. इंधनाच्या वाढत्या किमती, वाढते प्रदूषण, त्यामुळे होणाऱी पर्यावरणाची हानी याचा विचार करुन प्रत्येक नागरिकाने सायकल चालविण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असा संदेश सायकल स्वारांकडून वाटेतील गावांमध्ये देण्यात आला. सरदार पटेल यांच्या एकात्मता स्मारकाजवळ पोहचल्यावर सायकल स्वारांनी जल्लोष केला. उपस्थित नागरिक, पर्यटकांकडून या सायकल स्वारांचे कौतुक करण्यात आले.

हेही वाचा >>>डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानका जवळील स्कायवाॅकचे कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता

कल्याण मधील हे सायकल स्वार ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात सायकलवर भ्रमंती करुन सामाजिक सुरक्षितता, पर्यावरण संवर्धन, आदिवासी पाड्यावरील मुलांचे शिक्षण आणि त्यांना साहाय्य यासाठी उपक्रम राबवित असतात. कल्याण ते गुजरात सायकल मोहिमेत तुषार डेरे, अभिजीत गन्दम, सुधांशु फणसे, आकाश पटेल, संदेश परदेशी, वर्षा येवले, कविता लथा, दिलीप सुळे, जय पाटील, संजय पाटील सहभागी झाले होते. ७१ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक तरुणांना लाजवेल अशा पध्दतीने सायकल चालवित या मोहिमेत सहभागी झाले होते.

हेही वाचा >>>ठाणे शहरात आठ ठिकाणी ‘मियावाकी जंगल’; शहराला हिरवेगार करण्यासाठी महापालिकेचा उपक्रम

“ सततच्या बैठ्या कामांमुळे अनेकांना व्याधी जडतात. अशाही परिस्थितीत चालणे, सायकल स्वारी केली तर या आजारांना प्रतिबंध होऊ शकतो. सुदृढ आरोग्यात सायकलही महत्वाची भूमिका बजावत असते. सायकल चालवा आणि सुदृढ राहा. हा संदेश घेऊन आम्ही कल्याण ते गुजरात सायकल मोहीम केली.”-तुषार डेरे,सायकलपटू

(कल्याण मधील सायकल स्वारांनी गुजरात येथे एकात्मतेच्या स्मारका जवळ पोहचात जल्लोष साजरा केला.)

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 15:38 IST
Next Story
डोंबिवलीतील ३८ बेकायदा इमारतींमधील एक हजार सदनिकांचे खरेदी-विक्री व्यवहार रोखले