प्रेमसंबंधाच्या वादातून कल्याण पूर्वेतील खडेगोळवली येथे शनिवारी मुंबईतील मानखुर्द येथील आदित्य बर या तरुणाची चार जणांनी निर्घृण हत्या केली होती. या तरुणाच्या मारेकऱ्यांना कोळसेवाडी पोलिसांनी मध्यप्रदेशातून २४ तासाच्या आत अटक केली. ललित उज्जैनकर, सागर, रोहित आणि नकुल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा- ठाणे : पंजाबमधील सोनू खत्री टोळीचे गुन्हेगारांना आंबिवलीतून अटक

खडेगोळवलीत राहणाऱ्या आरोपी ललितचे एका तरुणी बरोबर प्रेमसंबंध होते. ललित नोकरी करत नसल्याने आणि तो मद्यपान करत असल्याने तरुणीने त्याच्या बरोबरचे प्रेमसंबंध तोडले होते. त्याचा राग ललितला होता. या तरुणीने नंतर मानखुर्द येथील आदित्य बर या तरुणाबरोबर आपले प्रेमसंबंध निर्माण केले होते. याचा राग ललितच्या मनात होता.

हेही वाचा- ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायतसमिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारी संध्याकाळी आदित्य, तरुणी हे दोघे ललितच्या घरी असलेले श्वानाचे पिल्लू घेण्यासाठी आले. त्यावेळी पू्र्वनियोजित कट करुन ललित आणि त्याच्या चार साथीदारांनी खेडगोळवली भागात तरुणीच्या समोर तिचा प्रियकर आदित्यची हत्या केली. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. चारही मारेकरी खडेगोळवलीतील रहिवासी आहेत. या आरोपींना सोमवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, असे साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी सांगितले.