konkan tourism news : महसूल दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.विकास खरगे यांच्यासोबत कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी हे उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. सूर्यवंशी यांनी महसूल दिनानिमित्त पुरस्कार मिळालेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच कोकण विभागातील सात जिल्ह्यांची माहिती देत येथील पर्यटन बाबतही महत्वाची माहिती दिली.
महसूल दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.विकास खरगे हे उपस्थित होते. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, अपर आयुक्त वैशाली इंदानी, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रुपाली भालके, सह आयुक्त रवी पाटील, रविंद्र पवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, अमित सानप, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, व्याख्याते डॉ.दत्ता कोहिनकर, आदि मान्यवर उपस्थित होते. डॉ. खरगे यांच्या हस्ते कोकण विभागातील सात जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यानंतर कोकण विभागीय आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ.खारगे यांना कोकण विभागातील सात जिल्ह्यांची माहिती दिली.
म्हणूनच महसूल विभागाकडे काम सोपविले जाते
महसूल दिनानिमित्त पुरस्कार मिळालेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ज्यांना पुरस्कार मिळाल नाही त्यांनी आजून जोमाने काम करुन पुढच्या वर्षी पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. महसूल विभाग सर्व स्तरावर काम करतो. कोणतीही आपत्ती असो महसूल विभाग नागरिकांना सेवा पुरविण्यात अग्रेसर असतो. कोणतेही काम यशस्वी करायचे असेल तर ते काम महसूल विभागाकडे सोपविले जाते, असे डॉ. सूर्यवंशी म्हणाले.
शिवदुर्ग दर्शन प्रकल्पांतर्गत ५१ किल्ल्यांची..
कोकण विभागाला एैतिहासिक वारसा आहे. कोकण विभागाने नागरिकांना उत्तमोत्तम सेवा पुरविण्यासाठी महत्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. आपले सेवा पोर्टलवरील सर्व सेवा ग्रामपंचायत स्तरावर सक्रीय करण्यात येणार आहेत. मुंबई उपनगरात ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड सुविधा सुरु करण्यात येणार आहे. जमिनीचे फेरफार क्लिअर करण्यात येणार आहेत. शिवदुर्ग दर्शन प्रकल्पांतर्गत ५१ किल्ले निवडले असून त्यातील ३५ बाबींचा अभ्यास सुरु आहे. कोकणात पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. पर्यटकांना उत्तमोत्तम सुविधा देण्यावर भर असेल. यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छ सागरी किनारे ही मोहिम देखील प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे, अशी कोकण पर्यटनाबाबत डॉ. सूर्यवंशी यांनी माहिती दिली.