ठाणे : महापालिकेच्या निवडणूकीसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. यामध्ये सोडतीद्वारे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तसेच शनिवार ३० जुलै रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर शनिवार ३० जुलै ते मंगळवार २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे.  हरकत व सूचना महापालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर कराव्यात, असे पालिकेने कळविले आहे.