ठाणे : ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई येथील ग्राहकांना खरेदीसोबत आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देणाऱ्या पितांबरी प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या सातव्या पर्वाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवात आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिजन्सी ग्रुप आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होणाऱ्या या खरेदी उत्सवात ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि नवी मुंबई परिसरांतील अनेक गृहपयोगी वस्तूंच्या दुकानांनी सहभाग दर्शवला आहे. या खरेदी उत्सवात रविवार, १६ फेब्रुवारीपर्यंत सहभागी होण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. पितांबरी प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये’ सहभागी झालेल्या वेगवेगळ्या दुकानात खरेदी केल्यावर ग्राहकांना दररोज आकर्षक भेटवस्तू जिंकता येणार आहेत. या खरेदी उत्सवाच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पहिल्या भाग्यवान विजेत्याला विशेष पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे.

कसे सहभागी व्हाल?

  • पितांबरी प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग महोत्सवात’ सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांची संधी मिळू शकेल.
  • सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देयक दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कूपन दिले जाईल.
  • ते  कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.
  • अर्धवट माहिती भरलेली कूपन फेटाळले जातील.

‘ड्रॉपबॉक्स’मध्ये दररोज जमा होणाऱ्या कूपनमधून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ आणि ‘लोकसत्ता महामुंबई’ मधून प्रसिद्ध केले जाईल. या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.

महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दुकानदारांसाठी संपर्क क्रमांक

कृष्णा नागरे- ९८३३१४७८७१

गोविंद भोसले- ९८१९८१४२५३

गौरव याज्ञिक- ७५०६५२९०२०

हर्षद गोफणे- ९७६९१३३३४३

प्रदीप पंजाबी- ९८२१५३४६७७

(नवी मुंबई)

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta thane shopping festival gift akp
First published on: 23-01-2020 at 01:06 IST