ठाणे : अयोध्या येथे सोमवारी राम मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. संपूर्ण देशात राममय वातावरण झाले असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तलावपाली येथे महाआरती केली जाणार आहे. महाआरतीपूर्वी ठाण्यातील प्रसिद्ध कौपिनेश्वर मंदिर ते तलावपालीपर्यंत राम मंदिराच्या प्रतिकृतीची मिरवणूकदेखील काढली जाणार असून दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो ठाणेकर गर्दी करण्याची शक्यता आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज मैदानात त्यांची वाहने उभी करता येऊ शकतात अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

अयोध्या येथे राम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे. या सोहळ्यापूर्वी संपूर्ण देशभरात विविध हिंदू संघटना तसेच राजकीय पक्षांकडून कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. शनिवारी ठाणे शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही ठाण्यात महाआरतीचे आयोजन केले आहे. ही महाआरती तलावपाली येथे केली जाणार असून त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहे. या महाआरतीसाठी शुक्रवारी रात्रीपासून तलावपाली परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महाआरतीपूर्वी ठाण्यातील प्रसिद्ध कौपिनेश्वर मंदिर ते तलावपालीपर्यंत राम मंदिराच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढली जाणार आहे. तसेच तलावामध्ये तरंगता रंगमंचही उभारण्यात आला आहे. या रंगमंचावर श्रीरामाचा वनवास ते राज्याभिषेक याचा लेझर शो दाखविला जाणार आहे.

हेही वाचा – भिवंडीतील मासबंदीचा निर्णय एकतर्फी? निर्णयाला समर्थनावरुन तर्क वितर्क

हेही वाचा – ठाणे : गोड तुझे नाम… जय श्रीराम नाम असणाऱ्या पेढ्यांना नागरिकांची अधिकची पसंती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सोहळ्याला हजारो ठाणेकर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज मैदानात त्यांची वाहने उभी करता येऊ शकतात, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली.