शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून मुंबईत दसरा मेळावे आयोजित करून शक्तीप्रदर्शन करण्यात आले असून त्यापाठोपाठ आता शिवसेनेतील फुटीचा आणि राज्यातील सत्ताबदलाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे शहरातुन रविवार, उद्यापासून महाप्रबोधन यात्रेला सुरुवात करण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतला आहे. या यात्रेच्या निमित्ताने उद्या जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्याला धर्मराज्य पक्षाचे राजन राजे हे सुध्दा उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा >>>ठाण्यात व्यावसायिकावर गोळीबार

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फूट पडली असून यातून विविध कारणावरून शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होताना दिसत आहे. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातवाबाबत उद्धव ठाकरे यांनी आक्षेपार्ह विधान केले आणि त्याचे पडसाद ठाण्यात उमटताना दिसले. ठाणे येथील मनोरमानगर भागात वाचनालय ताब्यात घेण्यावरून काही दिवसांपूर्वी शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाले होते. त्यापाठोपाठ शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील कोपरीतील कुंभारवाडा भागातील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा आमने सामने समोर आले होते. यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र असून येत्या काही दिवसांत वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>>डोंबिवली एमआयडीसीतील कामगाराचा मित्राकडून खून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे शहरातुन महाप्रबोधन यात्रेला सुरुवात करण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतला आहे. या यात्रेच्या निमित्ताने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रविवार दिनांक ९ ऑक्टोंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या जाहीर मेळाव्यासाठी शिवसेना नेते भास्कर जाधव , शिवसेना सचिव विनायक राऊत शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांचा प्रमुख मार्गदर्शन शिवसैनिकांना करणार आहेत. तसेच धर्म राज्य पक्षाचे राजन राजे सुध्दा या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना अतुट नात्याला गद्दारीचा शिक्का लागला असून स्वतःच्या राजकीय हवासापोटी शिवसेनेची गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शिवसेनेची तोफ ठाण्यात येणार आहे. हा मेळावा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठीच नाही तर सर्व सामान्य नागरिकांसाठीही असणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाणे जिल्हा प्रवक्ते (ठाकरे गट) चिंतामणी कारखानीस यांनी दिली आहे.