डोंबिवली- डोंबिवली पश्चिमेतील ठाकुर्ली उड्डाण पुलाजवळील रेल्वे मैदानाजवळ बावनचाळ भागात रविवारी रात्री एका ५२ वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला आहे. या व्यक्तीची हत्या करुन मृतदेह झाडाखाली फेकून देण्यात आला होता. सोमवारी दुपारी या भागात दुर्गंधी येऊ लागल्यानंतर खुनाची ही घटना उघड झाली.

हेही वाचा >>> विजय वडेट्टीवार यांच्याकडून पक्षाला घरचा आहेर; म्हणाले “गोडबोले नेत्यांमुळे काँग्रेस…”

मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे परिसरातील मैदानामध्ये एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीचे शरीर रक्ताच्या थारोळ्यात पडले आहे, अशी माहिती विष्णुनगर पोलिसांना सोमवारी दुपारी मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्यासह तपास पथक घटनास्थळी दाखल झाले. या व्यक्तीच्या डोक्यावर प्रहार केल्याचे दिसून येत होते. डोक्याला मार लागल्यामळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> ठाणे: अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; महाविकास आघाडीला धक्का

मृत व्यक्तीजवळ कोणतेही ओळखपत्र नाही. या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला होता. तर दुसरीकडे बावनचाळ भागात एका पडक्या भिंतीला शर्ट, पॅन्ड, दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे हे कपडे या इसमाचे असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. ठाकुर्ली उड्डाणपूल, महात्मा गांधी रस्ता, भावे सभागृह, गणेशनगर भागातील सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या माध्यमातून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

हेही वाचा >>> केंद्रातील हुकूमशाहीला लोकशाही मार्गानेच उत्तर देऊ; हम डरेंगे नहीं, लडेंगे और… – नाना पटोलेंचा इशारा!

गणेशनगर बावनचाळ भागातील एका व्यक्तीने मद्यविक्रीच्या दुकानातून दारूची खरेदी केली असल्याचे या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. या चित्रिकरणाच्या आधारे या इसमासोबत आणखी कोण होते? दारूची मेजवानी करताना झालेल्या भांडातून ही हत्या झाली आहे का? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

हेही वाचा >>> वाघ, बिबट्यापासून संरक्षणासाठी पंधरा फूट उंच जाळी; चंद्रपुरातील दुर्गापूर, ऊर्जानगर, नेरी व कोंडी येथे कामाला सुरुवात

विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या खुनामागील नक्की कारण आरोपी सापाडल्याशिवाय उलगडणार नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. मयत कचरा वेचक असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> Vidhan Parishad Election 2022: अखेरच्या क्षणी सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे

दरम्यान, रेल्वे मैदान परिसरात संध्याकाळी सात ते पहाटे पाच वाजेपर्यंत वीजेचे दिवे नसल्याने अंधार असतो. दिवसा या भागात रहिवासी फिरण्यासाठी येतात. या भागात रेल्वेची जुनी निवासस्थाने होती. तेथे काही गैरप्रकार रात्रीच्या वेळेत चालत होते. याविषयी आमदार रवींद्र चव्हाण यांनी रेल्वे मंत्री, अधिकाऱ्यांना पत्रं दिली होती. या पत्राची दखल घेऊन गेल्या महिन्यात रेल्वेने रेल्वे मैदान परिसरातील पडझड झालेली निवासस्थाने जमीनदोस्त केली. त्यामुळे या भागातील वर्दळ कमी झाली आहे.

हेही वाचा >>> ‘गिनेस’ मध्ये नोंद झालेल्या महामार्गावर वाहनवेगाचा बळी ; अज्ञात वाहनाच्या धडकेने नीलगाय ठार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भागातील रहिवासी पहाटे चार वाजल्यापासून रेल्वे मैदान भागातील झाडेझुडपे असलेल्या भागात फिरण्यासाठी येतात. दोन वर्षापूर्वी येथे एका व्यक्तीचा मृतदेह पिशवीमध्ये भरून ती पिशवी रेल्वे मैदानात आणून टाकण्यात आली होती. मयत व्यक्ती ही भांडुप भागातील होती. पैशाच्या देवघेवीतून हा वाद झाला होता, असे तपासात उघड झाले होते. डोंबिवलीतील देवी चौकातील एका १४ वर्षाच्या मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी लुटण्यासाठी एका रिक्षा चालकाने त्याला रेल्वे मैदानात आणले होते. त्यामुळे रेल्वेने या भागात पथदिवे लावण्याची मागणी पुढे येत आहे.