बदलापूरः अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सोमवारी जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीत दोन्ही शहरांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रस्थापितांना धक्का बसला आहे. दोन्ही शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत. त्यामुळे त्यांना आता पर्यायी प्रभागांचा शोध घ्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे यात भाजप पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांचे प्रभाग सुरक्षित झाले आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवलीत घातक पान मसाला विक्रेत्यावर कारवाई

water Mumbai, water distribution,
‘चावीवाले’ निवडणूक कामात, पाणी कोण सोडणार?
Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
water Buldhana district, water shortage Buldhana
बुलढाणा : ‘दिल्ली’च्या लढतीत व्यस्त नेत्यांचे ‘गल्ली’कडे दुर्लक्ष! दोन लाख मतदारांची पाण्यासाठी ससेहोलपट
Bhatrihari Mahtab recently joined the BJP after leaving the Biju Janata Dal
भाजप – बिजद यांच्या मैत्रीपूर्ण संघर्षांत कुणाची सरशी?

गेल्या आठवड्यात अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी दोन्ही नगरपालिकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांचे आरक्षण सोडत पार पडली. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या आरक्षण सोडतीसाठी सकाळपासून कात्रप येथील पालिकेच्या सभागृहात विविध पक्षाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये पदपथांवरील बेकायदा टपऱ्या, निवारे हटविण्याची मोहीम ; डोंबिवलीत कारवाई ठप्प

सुरूवातीलाच लोकसंख्येच्या निकषानुसार बदलापूर शहरातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी आरक्षित प्रभागांची घोषणा करण्यात आली. यात प्रभाग क्रमांक ९, १२, १०,२२, १७, २३ आणि ६ या प्रभागांचा समावेश होता. यातील चार जागांसाठी सोडत काढली असता प्रभाग क्रमांक ९, १२, २२ आणि ६ हे प्रभाग अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित झाले. तर अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक एक आणि दोन आरक्षित झाले. यात सोडतीनंतर प्रभाग क्रमांक दोन हा अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित झाला.

हेही वाचा >>> ठाण्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन;आंदोलनात दीड ते दोन हजार कर्मचाऱ्यांचा समावेश

अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रमांक १, ४, ७, ८, ९, १४, १७, १९ हे आरक्षित असल्याचे जाहीर करण्यात आले. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी सोडत काढली असता त्यात प्रभाग क्रमांक ७, १४, १७ आणि १९ हे चार प्रभाग आरक्षित झाले. तर अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग क्रमांक २८ आणि २९ पैकी २९ हा प्रभाग अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित झाला. तर दोन्ही शहरातील उर्वरित अनारक्षित प्रत्येक प्रभागात अ जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहे.

हेही वाचा >>> घोडबंदरमधील पाणी टंचाईविरोधात भाजपचा पालिकेवर मोर्चा

महाविकास आघाडीची अडचण

कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे रहात असलेला वडवली भागातील प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष असलेले आशिष दामले यांचा प्रभाग क्रमांक सहा हा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाला. प्रभाग क्रमांक १२ आणि २२ येथेही आरक्षणबदलामुळे शिवसेनेला फटका बसणार असल्याचे बोलले जाते आहे.

हेही वाचा >>> व्हॉट्सपवर तेढ निर्माण करणारा मजकूर पसरविणाऱ्यावर गुन्हा , कल्याणमध्ये कोळसेवाडी पोलिसांची कारवाई

यात भाजपाच्या प्रमुख माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे प्रभाग सुरक्षित झाले आहेत. तर अंबरनामध्ये शिवसेना महत्त्वाच्या नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसताना दिसतो आहे. प्रभाग क्रमांक ४ आणि ७ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहरातील महत्वाच्या नेत्यालाही आरक्षणाचा फटका बसणार आहे. अंबरनाथमध्ये कॉंग्रेसला या प्रभाग आरक्षणाचा फायदा होताना दिसतो आहे. त्यामुळे प्रस्थापीत, ज्येष्ठ माजी नगरसेवकांनी आता शेजारच्या सुरक्षीत प्रभागांमध्ये चाचपणी सुरू केली आहे.