लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : काही दिवसापूर्वी डोंबिवलीत एका वडिलाने आपल्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच, आता अन्य एका घटनेत वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी डोंबिवलीत घडली आहे.

मुलीने वडिलांच्या कृत्याला विरोध केला म्हणून तिची शाळेची पुस्तके, कपडे वडिलांनी रागाच्या भरात जाळून टाकले आहेत. घरात घडलेला हा प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितला. पत्नीने पतीला घडल्या प्रकाराबद्दल जाब विचारला. त्यावेळी पतीने पत्नीसह मुलींना चापटीने मारहाण केली. गेल्या सात दिवसाच्या कालावधीत दोन वेळा वडिलांनी आपल्या मुलीचा विनयभंग केला आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने पती विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने वडिलांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा-कल्याणमध्ये खडकपाडा भागात कचऱ्यांच्या ढीग, वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने नागरिक नाराज

मुलीच्या आईने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की रविवारी संध्याकाळच्या वेळेत मुलगी घरात एकटी होती. यावेळी वडिलांनी पीडित मुलीचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिने या सगळ्या प्रकाराला कडाडून विरोध केला. घडल्या प्रकाराने मुलगी घाबरली. तिने आई आल्यानंतर तिला वडिलांकडून झालेला प्रकार सांगितला. त्यावेळी पीडित मुलीचे आई, वडिलांमध्ये याविषयावर वाद झाला. या वादाच्यावेळी संतप्त झालेल्या वडिलांनी पत्नीला व पीडित मुलीला चापटीने मारहाण केली. या मुलीने घडला प्रकार घरात सांगितला म्हणून तिची घरातील शाळेची पुस्तके आणि तिचे कपडे कपाटातून काढून ते जाळून टाकले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानपाडा पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती जगताप याप्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास आम्ही सुरू केला आहे, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले.