श्रद्धा वालकरच्या हत्याकांडापेक्षाही भयंकर हत्याकांड हे मीरा रोडमध्ये घडलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मनोज सानेने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केले. काही तुकडे शिजवले, काही भाजले तर काहींची विल्हेवाट लावली. मात्र मनोज सानेला अटक करण्यात आली आहे. तसंच सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडेही जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणात मनोज सानेची चौकशी सुरु आहे. सरस्वती अनाथ होती. तिने मनोज हा आपला मामा आहे आणि तो खूप श्रीमंत आहे अशी ओळख करुन दिली होती. अनाथ आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

निर्घृण हत्येनंतर सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. मात्र सरस्वती ही मनोजला भेटण्याआधी एका अनाथ आश्रमात राहात होती. आश्रमात काम करणाऱ्या अनु साळवे यांनी सांगितलं की सरस्वती ही मनोज सानेला मामा अशी हाक मारत होती. तसंच माझा मामा खूप पैसैवाला आहे, श्रीमंत आहे असं तिने सांगितलं होतं. मनोज साने जेव्हा तिच्या आयुष्यात आला त्यानंतर ते दोघं कारने आश्रमात यायचे. सरस्वती तिच्यासह इतर मुलांसाठी जेवण, खाऊ आणि कपडे आणायची असंही साळवे यांनी सांगितलं. NDTV ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. ती सुरुवातीला यायची तेव्हा ती खुश असायची. मात्र दोन वर्षांपासून ती दुःखी होती. जास्त कुणाशी बोलायची नाही. सरस्वती जेव्हा १८ वर्षांची झाली तेव्हा ती अनाथ आश्रमातून तिच्या बहिणीकडे गेली होती. असंही साळवे यांनी स्पष्ट केलं.

मनोज साने शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कसा पकडला गेला?

मनोज सानेच्या घरासमोर राहणारा त्याचा शेजारी सोमेश याने सांगितलं की दोन ते तीन दिवसांपासून मनोजच्या घरातून दुर्गंध येत होता. सुरुवातीला आम्हाला वाटलं उंदीर वगैरे मेला असेल. त्याचा वास येत असेल. त्यामुळे मी त्याच्या घराचा दरवाजाही ठोठावला पण त्याने दार उघडलं नाही. त्यानंतर स्प्रे मारण्याचा आवाज आला आणि दुर्गंधी ऐवजी रुम फ्रेशनरचा वास येऊ लागला. तेव्हा सोमेशने पोलिसांना कळवलं आणि सदर घटना उघडकीस आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी घटनास्थळी काय पाहिलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोजच्या घरात वुड कटर, तीन बादल्यांमध्ये सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे, काळी पॉलिथिन बॅग, पातेल्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे, मिक्सरमध्ये अंश असं सगळं भयंकर चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं. यानंतर पोलिसांनी मनोज सानेला अटक केली आहे.