ठाणे : ठाणे महापालिका प्रारुप प्रभाग रचनेसंदर्भात दाखल झालेल्या २७० तक्रारींवर आज, बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील कै नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्राधिकृत अधिकारी राज्याचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली. या सुनावणीला शिवसेना (उबाठा), मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित उपस्थित राहून संपूर्ण प्रभाग रचनेवर हरकत नोंदवली. त्यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी शहराची नव्हे तर प्रभागाची सुनावणी घेण्याचा आग्रह धरताच, मनसे नेते अविनाश जाधव संतापले. एका प्रभागाची नाही तर अख्ख्या शहराची वाट लावलेय. म्हणून प्रभागाचा विचार करू नका तर शहराचा विचार करा, असे आवाहन त्यांनी केले.

बुधवारी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे राजन विचारे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. या पाचही पक्षांच्या नेत्यांनी या रचनेवर आक्षेप नोंदवले. ठाणे महापालिका मुख्यालयातील कै नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्राधिकृत अधिकारी राज्याचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली. या सुनावणीला शिवसेना (उबाठा), मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित उपस्थित राहून संपूर्ण प्रभाग रचनेवर हरकत नोंदवली.

या सुनावणीला शिवसेना (उबाठा), मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित उपस्थित राहून संपूर्ण प्रभाग रचनेवर हरकत नोंदवत होते. त्यावेळी सुनावणीसाठी भाजपचे पदाधिकारीहि त्याठिकाणी आले होते. मात्र, शिवसेना (उबाठा), मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस या पक्षाचे नेते मुद्दे मांडत होते, त्यामुळे भाजप नेत्यांना आपली मते मांडता येत नव्हती. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी शहराची नव्हे तर प्रभागाची सुनावणी घेण्याचा आग्रह धरताच, मनसे नेते अविनाश जाधव संतापले.

संपूर्ण शहराचीच वाट लावली

केवळ एका प्रभागाची नव्हे तर संपूर्ण शहराचीच वाट लावली आहे, असा आरोप करत एका प्रभागाचा विचार करून नका, प्रभागातून बाहेर पडा आणि संपूर्ण शहराचा विचार करा, असे आवाहन मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी उपस्थितांना केला. प्रारूप रचना गणपतीपूर्वी प्रसिद्ध केली आणि सुनावणी गणपतीनंतर ठेवली. त्यामुळे आम्हाला नीट अभ्यास करण्यासाठी वेळच मिळाला नाही. पुढील तारखेला पुन्हा सुनावणी घ्यावी, आम्हाला योग्य संधी द्यावी” अशी मागणी त्यांनी केली.

अशी झाली आहे प्रभाग रचना

२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ३३ प्रभागांतून १३१ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी ३२ प्रभाग हे चार सदस्यांचे तर, एक प्रभाग तीन सदस्यांचा होता. यंदाही हीच रचना कायम ठेवण्यात आली आहे. चार सदस्यांच्या प्रभागासाठी ५० ते ६२ हजार लोकसंख्या आणि तीन सदस्यांच्या प्रभागासाठी जवळपास ३८ हजार लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे.