ठाणे : स्वातंत्र्यदिनी मुंब्रा शहरात कार रॅली काढण्यात आली होती. सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने तसेच रॅलीत जीवाला धोका निर्माण होईल अशा प्रकारे कार चालविल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.

स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला वाय जंक्शन, शिळफाटा भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मुंब्रा पोलिसांनी परवानगी दिली होती. परंतु काही तरुणांनी विना परवाना कार रॅली काढली होती. त्याचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वीच मुंब्रा पोलिसांना प्राप्त झाले. यानंतर पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली. रॅली दरम्यान तरुण कारच्या खिडकीमधून बाहेर डोकावून वाहने चालवित होते. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने तसेच रॅलीत जीवाला धोका निर्माण होईल अशा प्रकारे कार चालविल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५, ३७ (३), महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ चे कलम १८४ आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ चे कलम १२५, २२३, २८१ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.