ठाणे : ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आणि एकेकाळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे नजीब मुल्ला यांच्या  वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुशायरा कार्यक्रमात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासमवेत भाजपाच्या काही माजी नगरसेवकांनी हजेरी लावली. तर नजीब मुल्ला हे अभ्यासू नगरसेवक असून ते आमदारकीसाठी परफेक्ट मटेरियल असून ते आमच्या पक्षात येणार असतील तर त्यांचे नक्कीच स्वागत करू. असे वक्तव्य नरेश म्हस्के यांनी यावेळी केले.

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून जितेंद्र आव्हाड यांची कोंडी केली जात असल्याच्या चर्चा  राजकीय वर्तुळात जोर धरत आहेत. कळवा मुंब्रा भागात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त काही फलक लावण्यात आले होते.  मात्र त्यांच्या शुभेच्छासाठीच्या फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचे फोटो असल्याने अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आले होते.

VIDEO :

हेही वाचा >>> ठाणे : बाळासाहेबांचे अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करा, जैन धर्मगुरूंनी राज ठाकरेंकडे व्यक्त केली अपेक्षा

या फलकानानंतर नरेश म्हस्के तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे काही माजी नगरसेवक यांनी नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुशायरा कार्यक्रमाला थेट हजेरीच लावल्यानी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून जितेंद्र आव्हाड यांची कोंडी केली जात असल्याच्या चर्चांनी अधिक जोर धरला आहे. तर या मुशायरा कार्यक्रमात ”कामयाबी के सफर मे मुश्किले तो आयेंगीही, चलते रेहना की कदम कभी रुकने न पाये, मंजिल तो मंजिल है एकदिन तो आयेगीही ” असा मुशायरा सादर करून नजीब हे आमदारकीसाठी परफेक्ट मटेरियल असून ते आमच्या पक्षात येणार असतील तर त्यांचे नक्कीच स्वागत करू. असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा >>> ठाण्यातील आणखी १५७ रस्त्यांचे लवकरच नुतनीकरण, राज्य सरकारने पालिकेला दिला ३९१ कोटी रुपयांचा निधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नजीब मुल्ला हे एकेकाळी जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जायचे. त्यामुळे नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात जाऊन  बाळासाहेबांची शिवसेना पक्षात त्यांचे कधीही स्वागत आहे असे वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केल्याने आव्हाडांची पालिका निवडणुकीच्या तोंडावर कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. तर यावेळी नरेश म्हस्के यांच्या समवेत भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार, संजय वाघुले, मिलिंद पाटणकर तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे हे देखील उपस्थित होते.