लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारच्या सभेसाठी व्यासपीठावर स्थान न मिळाल्याने नाराज झालेले शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण-मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी आपल्या पदाचा बुधवारी तडकाफडकी राजीनामा दिला.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Unannounced shutdown in Kalyan city due to Prime Minister Narendra Modis meeting
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने कल्याण शहर अघोषित बंद
Over 200 illegal hoardings in Kalyan-Dombivli municipal corporation area
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत २०० हून अधिक बेकायदा फलक
Activists in scorching heat for pm narendra modis meeting in Kalyan Maximum crowd from Bhiwandi and Kalyan rural areas
रणरणत्या उन्हात कार्यकर्ते कल्याणमधील मोदींच्या सभेसाठी; भिवंडी, कल्याण ग्रामीण भागातून सर्वाधिक गर्दी
Ajit pawar and sharad pawar (1)
“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न
Praful Patel
जिरेटोपाच्या वादावर प्रफुल पटेल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “यापुढे काळजी…”
Pm Narendra modi Speech in Nashik
“मोदींनी भाषणात अल्पसंख्याकांचा मुद्दा काढताच, शेतकरी ओरडला कांद्यावर बोला..”, पुढे नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी राजीनामा पाठविला आहे. सुरुवातीला ठाकरे गटाकडे असलेले मोरे शिंदे गटात यापूर्वीच दाखल झाले होते. मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. अलीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण, डोंबिवलीतील प्रत्येक कार्यक्रमात ते आघाडीवर होते. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोरे यांनी राजीनामा दिल्याने शिंदे गटात खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा-कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत २०० हून अधिक बेकायदा फलक

कल्याण-मुरबाडचे आपण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहोत. यजमान जिल्हाप्रमुख म्हणून आपणास मोदींच्या सभेच्या व्यासपीठावर स्थान पाहिजे होते. शिवसेनेच्या पक्षांतर्गत धोरणाप्रमाणे अनेक पदाधिकारी आपल्या अंतर्गत काम करत असतात. पक्ष पदाधिकाऱ्यांची एवढी मोठी फळी आपल्या अधिकारांतर्गत काम करत असताना आपणास मोदी यांच्या सभेसाठी व्यासपीठावर डावलणे योग्य नाही, अशी नाराजी अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा पत्रातून व्यक्त केली आहे.

यजमान जिल्हाप्रमुख म्हणून आपणास डावलण्यात आल्याने आपण शिंदे गटाचा कल्याण-मुरबाड जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहोत, असे मोरे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.अधिक माहितीसाठी अरविंद मोरे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला, पण त्यांचा मोबाईल बंद असल्याचा संदेश येत होता.