scorecardresearch

शहापूर: शेतकरी मोर्चात एकाचा मृत्यू

विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईला निघालेल्या शेतकरी मोर्चामधील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.

dead body
(प्रातिनिधिक छायाचित्र)

विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईला निघालेल्या शेतकरी मोर्चामधील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. पुंडलिक जाधव असे या शेतकऱ्याचे नाव असून ते दिंडोरी येथील रहिवासी होते. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये फेरीवाल्याला लुटणारा तोतया पोलीस अटकेत

शेतकऱ्यांचा मोर्चा वासिंद येथे थांबला असून त्यामधील पुंडलिक जाधव या शेतकऱ्याला शुक्रवारी रात्री उलट्यांचा त्रास व अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना वासिंद येथे उपलब्ध असणाऱ्या रुग्णवाहिकेतून शहापूर उपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जाधव यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसून अधिक तपास वासिंद पोलीस करीत आहेत. पुंडलिक जाधव नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मावडी येथे वास्तव्यास होते.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 22:40 IST