लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : शेअर बाजारात ट्रेडिंगच्या नावाखाली बँक अधिकाऱ्याचीच ऑनलाईन ११ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रककरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणूक झालेली व्यक्ती बँकेत मोठ्या पदावर आहेत. सुमारे महिन्याभरापूर्वी ते शेअर बाजाराबाबत माहिती घेत असताना त्यांच्या मोबाईलवर एका व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक प्राप्त झाली. त्यामुळे त्यांनी त्या लिंकवर क्लिक केले असता, ते व्हॉट्सॲप समूहामध्ये दाखल झाले. तिथे शेअर बाजारासंदर्भात माहिती दिली जात होती. त्या समूहात एका ॲपची लिंक देण्यात आली होती. त्यानुसार त्या लिंकवर क्लिक करून त्यांनी मोबाईलमध्ये ते ॲप सामाविष्ट केले. त्या ॲपवर त्यांनी थोडक्यात माहिती भरल्यानंतर ते ॲप सुरू झाले. त्या ॲपच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण ऐकून त्या बँक अधिकाऱ्याने ११ लाख रुपये ॲपमध्ये देण्यात आलेल्या खात्यात गुंतविले.

आणखी वाचा-एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे ऐवज चोरणारा चोरटा भिवंडी रेल्वे स्थानकातून अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गुंतवणूकीच्या मोबदल्यात त्यांना आता २३ लाख रुपये नफा दाखविण्यात येत होता. त्यांनी नफा काढण्यासाठी संबंधितांना संदेश पाठविला असता, त्यांच्याकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचा संशय आल्याने त्यांनी युट्युबवर सायबर पोलिसांनी दिलेली माहिती ऐकली. फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.