ठाणे : भिवंडी येथील रांजनोली ते दुर्गाडी पर्यंत मोठ्याप्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. तसेच या भागात व्यवसायिक दुकाने देखील आहे. येथे रस्त्यालगत वाहन चालक बेशिस्तपणे वाहने उभी करत असतात. त्यामुळे वाहतुक कोंडी होत असते.

ठाणे वाहतुक पोलिसांनी या मार्गावरील रांजनोली नाका ते दुर्गाडी पर्यंत वाहने उभी करण्यास बंदी घातली आहे. त्यासंदर्भाची अधिसूचना पोलिसांनी काढली आहे. ३० दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर ही अधिसूचना लागू असेल. याबाबत हरकती असल्यास त्या तीन हात नाका येथील ठाणे वाहतुक पोलिसांच्या कार्यालयात पाठविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

रांजनोली ते दुर्गाडी भागात ठिकठिकाणी दुकाने आहेत. या दुकानांमध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण भागातील हजारो नागरिक खरेदीसाठी येत असतात. तसेच या भागात लोकवस्ती वाढली आहे. या मार्गालगत ठिकठिकाणी वाहने उभी केली जातात. हा मार्ग महत्त्वाचा असल्याने वाहने उभी केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी या मार्गावरील रांजनोली नाका ते दुर्गाडी या पाच किलोमीटर अंतरावर दुतर्फा वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच रांजनोली ते भादवड नाका या मार्गावरही दुतर्फा वाहने उभी करण्यास बंदी आहे. त्यासंदर्भाची अधिसूचना ठाणे वाहतुक पोलिसांनी काढली आहे.

प्रायोगिक तत्त्वावर ३० दिवसांसाठी ही अधिसूचना लागू असेल. या अधिसूचने बाबत कोणाची हरकत असल्यास हरकती लेखी स्वरूपात तीन हात नाका येथील वाहतुक विभागाच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात पाठविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. हरकती किंवा आक्षेप आल्या नाही तर अधिसूचना कायम स्वरुपात अमलात राहिल असे पोलिसांनी स्पष्ट केले.