कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक येथून पायी चाललेल्या एका पादचाऱ्याला एका मोटार सायकल स्वाराने जोराची धडक दिली. या धडकेत पादचारी गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडला. त्याला रुग्णालयात नेण्यासाठी मदत करण्याऐवजी दुचाकी स्वार तेथून पळून गेले.बुधवारी रामबागमध्ये एका बुलेट चालकाने एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ठाकुर्लीत एका बुलेट चालकाने आजोबा, नातवाला गंभीर जखमी केले आहे. दुचाकी स्वारांचा कल्याण, डोंबिवलीत धुमाकूळ वाढला आहे. स्थानिक पोलिसांनी या वेगवान दुचाकी स्वारांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा >>>ठाणे जिल्हा गारठला;बदलापूरमध्ये यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद

power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
dombivli ganesh nagar marathi news, dombivli concrete road broken marathi news
डोंबिवली: पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या गणेशनगर मधील काँक्रीट रस्त्याची तोडफोड, नागरिकांमध्ये तीव्र संताप

नामदेव महाजन (५१, रा. आधारवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. नामदेव महाजन हे शुक्रवारी सकाळी कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक येथून पायी चालले होते. त्यावेळी भरधाव वेगात एका मोटार सायकलवरुन दोन जण वेगाने तेथून जात होते. दुचाकी स्वारांनी बेदरकारपणे दुचाकी चालवून नामदेव यांच्या अंगावर दुचाकी घालून जोराची धडक त्यांना दिली. या धडकेत नामदेव रस्त्यावर पडले. आपल्या चुकीमुळे नामदेव जखमी झाले आहेत. हे माहिती असुनही त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेणे, पोलिसांना घडल्या घटनेची माहिती देण्याऐवजी मोटार सायकल स्वार घटनास्थळी वरुन पळून गेले. नामदेव यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही यंत्रणेच्या व्दारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा >>>बदलापुरातील नाल्यात मृत डुकरे

कल्याण, डोंबिवलीतील अनेक दुचाकींना वाहन क्रमांक नाहीत. काही वाहने काळ्या काचा लावून चालविली जात आहेत. अशा वाहनांवर वाहतूक विभागा, आरटीओने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.