कल्याण: येथील पूर्व भागातील विठ्ठलवाडी भागातील एका बेकायदा चाळीत साठा करून ठेवलेला सात लाख रूपयांचा गुटखा कोळसेवाडी पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. या बेकायदा साठा प्रकरणातील पाच आरोपी फरार झाले आहेत.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनीष यादव आहे. त्याच्यासह इसरार अहमद, विनोद गंगवाणी आणि त्यांचे दोन साथीदार छाप्यानंतर फरार झाले आहेत. विठ्ठलवाडी येथील मंजुनाथ बारच्या मागील बाजूस असलेल्या गायकवाड चाळीत बेकायदा गुटख्याचा साठा करण्यात आला आहे. तेथून त्याची विक्री करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांना दिली.

हेही वाचा… ठाणे जिल्ह्यात केवळ ११ टक्केच नागरिकांना वर्धक मात्रेचे कवच; करोना वाढू लागताच मात्रा घेण्याचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी उल्हास जाधव, दिनकर पगारे यांच्या पथकाने गुरूवारी गायकवाड चाळीत छापामारून गुटखा जप्त केला. राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असताना तस्करांंनी हा गुटखा आणून त्याची चोरून परिसरात विक्री सुरू केली होती. डोंबिवली, कल्याण भागातील पान टपरी विक्रेत्यांना हा गुटखा विक्री केला जात असल्याची पोलिसांची माहिती आहे. गुटख्याच्या साठ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे, अशी माहिती मिळताच या साठा केंद्राकडे नियमित फेऱ्या मारणारे पाच आरोपी फरार झाले आहेत. यादव हा मुख्य आरोपी आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. हा गुटखा कुठून आणला. गायकवाड चाळीत त्यांना गुटखा ठेवण्यास जागा कोणी दिली, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी चाळ मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी रहिवाशांकडून जोर धरत आहे.