लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : मद्य पिऊन वाहने चालविणाऱ्या ९० वाहन चालकांवर कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये मागील दोन दिवसात वाहतूक पोलीस, पोलिसांनी कारवाई केली आहे. नववर्षाच्या उत्साहात अनेक वाहन चालक मद्य पिऊन वाहन चालवून अपघात करत असल्याने पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम शहरात राबवली. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.

सर्वाधिक वाहन चालविणारे मद्यपी कल्याण पश्चिमेत आढळून आले. डोंबिवलीत २० आणि कल्याण कोळसेवाडी भागात २६ मद्यपी आढळून आले. या सर्वांवर मोटार वाहन कायद्याने, भारतीय दंड संहितेप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही वाहन चालकांना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, असे वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी वाचा-नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे, कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचीन सांडभोर आणि कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. डोंबिवली, कल्याण शहरांमधील मुख्य वर्दळीचे रस्ते, चौकांमध्ये पोलीस, वाहतूक पोलिसांनी गस्त घालून ही कारवाई केली आहे.