scorecardresearch

Premium

रात्रंदिवस काम करुन डोंबिवली-कल्याणमधील खड्डे तीन दिवसात भरा; आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांचे आदेश

शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी पालिका हद्दीतील खड्डे भरणी करणाऱ्या सर्व ठेकेदारांना तातडीने आहे त्या सामग्रीमध्ये खड्डे भरणीची कामे करण्याचे आदेश दिले.

kdmc commissioner order to fill potholes in dombivli kalyan
कल्याणमधील खड्डे भरणीच्या कामांची आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडून रात्रीच्या वेळेत पाहणी.

कल्याण- पालिका हद्दीतील खड्डे भरणीची कामे येत्या तीन दिवसात रात्रंदिवस काम करुन पूर्ण करावीत. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिला आहे.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्ते खड्ड्यांनी गिळून टाकले आहेत. या रस्त्यांवरुन वाहने चालविताना चालकांना कसरत आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. मागील २५ दिवसाच्या कालावधीत पावसाने उघडिप देऊनही पालिकेने खड्डे न भरल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. आता गणेशोत्सव आला तरी खड्डे भरणीची कामे युध्दपातळीवर सुरू नसल्याने ही कामे पूर्ण होणार कधी, असे प्रश्न गणेशभक्तांकडून उपस्थित केले जात आहेत.

Police suspended Wardha
वर्धा : ‘ते’ दोन पोलीस अंमलदार अखेर निलंबित, मद्यधुंद अवस्थेत कार चालवत…
How effective is lidar survey Taxation of constructions in Gavthan and CIDCO colonies as before
‘लिडार’ कितपत प्रभावी? गावठाण, सिडको वसाहतींमधील बांधकामांना पूर्वीप्रमाणेच कर आकारणी
pune, police commissioner, amitesh kumar, action mode, maintain discipline,
पुण्याचे पोलीस आयुक्त संतापले, दलातील बेशिस्तीला चाप लावण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय
Anger among ST employees
भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युईटीचा भरणा न केल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रोष

हेही वाचा >>> डोंबिवलीत गावदेवी येथील बेकायदा इमारत भुईसपाट, उच्च न्यायालयाच्या आदेशाने पालिकेची रात्रंदिवस कारवाई

आयुक्त डॉ. दांगडे यांनी खड्डे भरणीची कामे तातडीने भरण्याचे आदेश सोमवारी सकाळी दिले.

शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी पालिका हद्दीतील खड्डे भरणी करणाऱ्या सर्व ठेकेदारांना तातडीने आहे त्या सामग्रीमध्ये खड्डे भरणीची कामे करण्याचे आदेश दिले. खड्डे भरणीची कामे सुरू झाले आहेत की नाहीत. ही कामे योग्यरितीने केली जात आहेत की नाहीत याची पाहणी करण्यासाठी आयुक्त दांगडे यांनी सोमवारी रात्री शहरातील विविध रस्त्यांवर सुरू असलेल्या खड्डे भरणीच्या कामाची पाहणी केली.

हेही वाचा >>> कोपर रेल्वे स्थानकातील नवीन तिकीट घर बंदच

येत्या तीन दिवसाच्या काळात रात्रंदिवस काम करुन खड्डे भरणीची कामे पूर्ण करा. गणपत्ती बाप्पांचे आगमन सुकर झाले पाहिजे. नागरिकांना सुस्थितीत प्रवास करता आला पाहिजे. अशा पध्दतीने काम करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकारी, ठेकेदारांना दिले. रस्ते पाहणीनंतर आयुक्तांनी कल्याण मधील दुर्गाडी गणेश घाट येथील गणपती बाप्पा विसर्जन स्थळाच्या नियोजनाची पाहणी केली. गणेशघाटावर खाडी किनारी पालिकेकडून गणपती विसर्जनाची तयारी केली जात आहे. खाडी किनारी गर्दी होणार नाही यादृष्टीने डोंबिवलीतही नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी शहर अभियंता अर्जुन अहिरे, माहिती विभागप्रमुख संजय जाधव, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, उप अभियंता शाम सोनावणे उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Potholes in dombivli kalyan fill in three days order by kdmc commissioner bhausaheb dangade zws

First published on: 12-09-2023 at 13:28 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×